मनसुख हिरन यांचा मृतदेह आढळला होता त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळला

Dead body found in Reti Bunder Mumbra: मनसुख हिरन यांचा मृतदेह ज्या रेतीबंदर खाडीत आढळला होता त्याच ठिकाणी आता आणखी एक मृतदेह आढळून आला आहे.

Thane A body has been found at the location in Reti Bunder Mumbra where Mansukh Hiran body was found
मनसुख हिरन यांचा मृतदेह आढळला होता त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळला  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • ठाण्यातील रेतीबंदर खाडीत आणखी एक मृतदेह आढळला
  • याच ठिकाणी मनसुख हिरन यांचा मृतदेह आढळला होता
  • पोलीस पथक घटनास्थळी दाखल, तपास सुरू

ठाणे : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या स्कॉर्पिओचे मालक मनसुखहिरन यांचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. ज्या ठिकाणी मनसुख हिरन यांचा मृतदेह आढळला होता त्याच ठिकाणी आता आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Thane A body has been found at the location in Reti Bunder Mumbra where Mansukh Hiran body was found)

मनसुख हिरन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात मनसुख हिरन यांच्या कुटुंबीयांनी आणि भाजपने सचिन वाझे यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यातच आता रेतीबंदर खाडीत आणखी एक मृतदेह आढळल्याने विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह एका पुरुषाचा असून सकाळच्या सुमारास हा व्यक्ती शौचास गेला असावा आणि त्याचा पाय घसरल्याने तो खाडीत पडला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी