Thane Ghodbunder Road Accident : ठाण्यातील घोडबंदर येथे खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्य़ांना झापले

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Jul 06, 2022 | 19:43 IST

आज ठाण्यातील घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांना झापले आहे.

थोडं पण कामाचं
  • आज ठाण्यातील घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीचा अपघात झाला.
  • या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
  • या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांना झापले आहे.

Thane Ghodbunder Road Accident : ठाणे : आज ठाण्यातील घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांना झापले आहे.

आज सुमारे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास काजूपाडा, घोडबंदर रोड येथे ठाणेकडून मीरा भाईंदरकडे कडे जाताना मोहसीन अहमद इरफान खान हा ३७ वर्षीय व्यक्ती दुचाकी चालवताना खड्डा चुकवताना अपघात झाला आणि ते खाली पडले. त्यावेळी मागून आलेल्या बसने त्यांना चिरडले त्यातच त्यांचा मृत्यू झाला.  सदर घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता असल्याने तात्काळ खड्डे बुजवण्यात आदेश देण्यात आले. अशाच प्रकारे एक अपघात घोडबंदरला झाला असून त्या व्यक्तीला दुखापत झाली आहे. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांची अधिकार्‍यांना झापले

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांना झापले आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ठाण्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुझवण्याचे निर्देश दिले असून अशी घटना पुन्हा घडता कामा नये अशी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी