Girl raped and blackmailed तरुणीवर बलात्कार करून काढले अश्लील फोटो आणि व्हिडीओ, लग्नाला नकार दिल्याने फोटो केले व्हायरल, नराधमला पोलिसांकडून अटक

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated May 10, 2022 | 16:12 IST

ठाण्यात एका तरुणाने मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणीवर बलात्कार केला आहे. तसेच नराधमाने या तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ शूट केले. त्यानंतर तरुणाने मुलीवर लग्नासाठी दबाव आणला, तिने जेव्हा नकार दिला तेव्हा आरोपीने पीडित तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.

rape
बलात्कार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ठाण्यात एका तरुणाने मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणीवर बलात्कार केला आहे.
  • तसेच नराधमाने या तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ शूट केले
  • आरोपीने पीडित तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.

Girl raped and blackmailed : ठाणे : ठाण्यात एका तरुणाने मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणीवर बलात्कार केला आहे. तसेच नराधमाने या तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ शूट केले. त्यानंतर तरुणाने मुलीवर लग्नासाठी दबाव आणला, तिने जेव्हा नकार दिला तेव्हा आरोपीने पीडित तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश उर्फ जिंतु सुरवसे हा दिवा इथला रहिवासी आहे. त्याची ओळख एका २३ वर्षीय तरुणीशी झाली. नंतर दोघांनी भेटण्याचे ठरवले. तेव्हा जिंतुने तरुणीला कोल्ड्रिंक सांगून बियर पाजली. त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर जिंतुने तरुणीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओही शूट केले. पीडित तरुणी जेव्हा शुद्धीत आली तेव्हा तिला धक्काच बसला. त्यानंतर या फोटो आणि अश्लील व्हिडीओवरून ब्लॅकमेल करून आरोपी जिंतुने अनेक वेळा तरुणीवर बलात्कार केला. 

त्यानंतर आरोपी जिंतूने तरुणीला लग्नाची मागणी घातली. परंतु तरुणीन त्याला नकार दिला. तरुणीचे एका ठिकाणी लग्न ठरले होते. त्या मुलाला पीडित तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ पाठवले. अखेर या सगळ्यांना कंटाळून तरुणीने पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी जिंतूविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीने मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना धमकी दिली. पोलीस आरोपीचा शोध घेत होते, परंतु तो सातत्याने आपले ठिकाण बदल होता. अखेर सापळा रचून पोलिसांनी गोव्याला जाताना पकडले आणि त्याची रवानगी तुरुंगात केली. आरोपी विकृत असून त्याने अशा प्रकारे अनेक महिला आणि तरुणींना त्रास दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी