Thane Lockdown: ठाण्यातील कोविड -१९ हॉटस्पॉट भागात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन

ठाणे
प्रशांत जाधव
Updated Mar 09, 2021 | 11:27 IST

 कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) सर्व देशभर (साथीचा रोग) सर्वत्र उद्रेक  थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्र (Maharashtra)आणि पंजाब (Punjab) मध्ये कोविड -१९ (COVID-19)ची प्रकरण  झपाट्याने वाढत आहेत.

thane municipal corporation imposes lockdown
ठाण्यातील कोविड -१९ हॉटस्पॉट भागात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन 

थोडं पण कामाचं

 • ठाण्यात आतापर्यंत अशा १६ क्षेत्रांची ओळख पटली
 •  कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) सर्व देशभर (साथीचा रोग) सर्वत्र उद्रेक  थांबण्याचे नाव घेत नाही.
 • महाराष्ट्र (Maharashtra)आणि पंजाब (Punjab) मध्ये कोविड -१९ (COVID-19)ची प्रकरण  झपाट्याने वाढत आहेत.

मुंबई :  कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) सर्व देशभर (साथीचा रोग) सर्वत्र उद्रेक  थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्र (Maharashtra)आणि पंजाब (Punjab) मध्ये कोविड -१९ (COVID-19)ची प्रकरण  झपाट्याने वाढत आहेत.  तसेच अन्य काही राज्यांतही कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, ठाण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ठाण्यातील काही भागात लॉकडाउन लादण्यात आले आहे. या ठिकाणी हॉटस्पॉट्स आहेत तेथे 31 मार्चपर्यंत  लॉकडाउन लागू असणार आहे. 


ठाण्यात वाढत्या कोरोना प्रकरणे लक्षात घेता प्रशासनाने लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, ज्या ठिकाणी हॉटस्पॉट्स आहेत, ते 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन सुरू राहतील. ठाणे महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार 16 ठिकाणी लॉकडाऊन सुरूच राहणार आहे.

उल्लेखनीय आहे की यापूर्वी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातही आंशिक लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. हे लॉकडाउन 11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान चालणार आहे. या दरम्यान काही नियमांचे पालन केले जाईल. सोमवारी ठाण्यात कोरोनाचे 746 नवीन रुग्ण आढळले. ज्यामुळे एकूण प्रकरणे वाढून  2,69,065  वर पोचली आहेत.

ठाणे शहरातील हॉटस्पॉटची यादी-

 1. आई नगर, कळवा
 2. सूर्या नगर, विटावा
 3. खरेगाव हेल्थ सेंटर
 4. चेंदणी कोळीवाडा
 5. श्रीनगर
 6. हिरानंदानी इस्टेट
 7. लोढा माजीवाडा
 8. रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
 9. लोढा अमारा
 10. शिवाजी नगर
 11. दोस्ती विहार
 12. हिरानंदानी मिडोज
 13. पाटील वाडी
 14. रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
 15. रुणवाल नगर, कोलबाद
 16. रुस्तोमजी, वृंदावन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने तोंडावर मास्क घालणे, सोशल डिस्टिन्सिंगचे पालन आणि वारंवार हात धुवायला पाहिजे, असे वारंवार सरकारकडून आणि ठाणे महानगर पालिकेकडून आवाहन केले जाते. एवढेच नव्हेतर, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी