सरसकट लॉकडाऊन नाही, अफवांना बळी पडू नका - ठाणे मनपा

ठाणे महापालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही

thane municipal corporation imposes lockdown in specific covid hotspot areas till march 31
सरसकट लॉकडाऊन नाही, अफवांना बळी पडू नका - ठाणे मनपा 

थोडं पण कामाचं

 • सरसकट लॉकडाऊन नाही, अफवांना बळी पडू नका - ठाणे मनपा
 • महाराष्ट्रात ९७ हजार ६३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
 • ठाणे शहरातील हॉटस्पॉटची यादी

ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (thane municipal corporation imposes lockdown in specific covid hotspot areas till march 31)

सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॅाटस्पॅाटची निर्मिती करण्यात आली आहे. या हॅाटस्पॅाट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोविड १९ चे रूग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच ३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते त्यानुसार सुरू राहतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आला नसून ज्या आस्थापना सुरु आहेत त्या आस्थापना यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे मनपा हद्दीतील प्रत्येक भागातील कोरोना रुग्णसंख्येचा दररोज आढावा घेतला जात आहे. ज्या भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे अशा भागांमध्ये लॉकडाऊन नाही. पण जिथे रुग्णसंख्या वाढत आहे अशा ठिकाणांना हॉटस्पॉट जाहीर करुन तिथे निर्बंध घातले असल्याची माहिती ठाणे मनपाने दिली.

याआधी औरंगाबादमध्ये ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीसाठी अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊन काळात औरंगाबादमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास बंद ठेवण्याचा निर्णय झाला. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू राहील, असे प्रशासनाने सांगितले. राजकीय सभा, धार्मिक सभा, संमेलन, क्रीडा स्पर्धा, विवाह सोहळा यांना बंदी लागू झाली. 

महाराष्ट्रात ९७ हजार ६३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात ९७ हजार ६३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जानेवारी २०२१ मध्ये कमी होत असल्याचे चित्र होते. पण फेब्रुवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. हा कल मार्च महिन्यातही दिसत आहे. यामुळे पुन्हा अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ दिसत आहे. मुंबईतील कोरोना संकटावर लक्ष ठेवून आहोत, आवश्यकता भासल्यास अंशतः लॉकडाऊन सारखे उपाय करण्याबाबत विचार करू, असे संकेतही राज्य सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्रात लसीकरण सुरू

राज्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. पण कोरोना संकट संपलेले नाही. यामुळे नागरिकांनी काटेकोरपणे कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक मास्क आहे. मास्कने नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणे, सोशल डिस्टंस राखणे, वैयक्तिक स्वच्छतेची आरोग्याची काळजी घेणे तसेच हात अधूनमधून धुवून स्वच्छ करणे अथवा सॅनिटायझर वापरुन स्वच्छ करणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने सांगितले. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. शिवाय या आजाराच्या विषाणूचे नवनवे अवतार जगभर सक्रीय होत आहेत. यामुळे प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रार्दूभाव होण्याचा धोका आहे; असे प्रशासनाने सांगितले.

ठाणे शहरातील हॉटस्पॉटची यादी-

 1. आई नगर, कळवा
 2. सूर्या नगर, विटावा
 3. खरेगाव हेल्थ सेंटर
 4. चेंदणी कोळीवाडा
 5. श्रीनगर
 6. हिरानंदानी इस्टेट
 7. लोढा माजीवाडा
 8. रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
 9. लोढा अमारा
 10. शिवाजी नगर
 11. दोस्ती विहार
 12. हिरानंदानी मिडोज
 13. पाटील वाडी
 14. रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
 15. रुणवाल नगर, कोलबाद
 16. रुस्तोमजी, वृंदावन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी