Thane prostitution racket : ठाण्यात अल्पवयीन मुलींवर शरीरविक्रयासाठी जबरदस्ती, पोलिसांनी सापळा रचून केली दोन मुलींची सुटका

अल्पवयीन मुलींना जबरदस्तीनं वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं जात असल्याची टीप मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि दोन मुलींची सुटका केली.

Thane prostitution racket
वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीने आणलेल्या दोन मुलींची सुटका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ठाणे जिल्ह्यात सेक्स रॅकेट उघड
  • दोन अल्पवयीन मुलींची सुटका
  • मुलींची नातेवाईकच करत होती सौदा

Thane prostitution racket | वेश्याव्यवसायासाठी (Prostitution) जबरदस्तीने आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची (Teenage girls) सुटका (Rescued) करण्यात आली आहे. या मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडलं जात होतं. या मुलींची विक्री करून पैसे कमावण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

पोलिसांना मिळाली टीप

मीरा-भायंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग विभागाच्या पोलिसांनी ही मोहिम फत्ते केली. काही दिवसांपूर्वी मीरा भायंदर परिसरात अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरु केला होता. काही अल्पवयीन मुलींना जबरदस्तीनं ठाणे जिल्ह्यात आणलं जात असून त्यांची विक्रीदेखील केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला. उघडउघड या प्रकारचाी माहिती देण्यास कुणीच तयार नसल्यामुळे अखेर पोलिसांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला आणि तो तडीस नेला. 

असा रचला सापळा

पोलिसांनी ग्राहक असल्याचं दाखवत 8 जून रोजी काशिमिरा परिसरातील एका फूड स्टॉलवर ठाण मांडला. तिथे वेश्या पुरवणारी एक व्यक्ती येत असल्याचं पोलिसांना समजलं होतं. त्या व्यक्तीकडे ग्राहक म्हणून पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी महिलांसोबतच अल्पवयीन मुलीदेखील आपण पुरवू शकतो, असा दावा इसमाने केला. अल्पवयीन मुलीसाठी त्यांनी 2 लाख रुपयांची मागणी केली. या व्यवहारात दोन महिला आणि एक पुरुष सहभागी होते.

अधिक वाचा - मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात निवासी इमारतीतल्या फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट

सुटका आणि अटक

अल्पवयीन मुलींबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. या प्रकरणी सौद्यात सहभागी असणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. फोनवरून एक पुरुषही या सौद्यात सहभागी होता. अद्याप तो पोलिसांना मिळालेला नाही. त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अटक झालेल्या दोन महिलांपैकी एक महिला ही अल्पवयीन मुलींची नातेवाईक आहे. अटक झाल्यानंतर दोन मुली आणि महिलेचा जो संवाद झाला, त्यातून पोलिसांना ही माहिती मिळाली. 

यापूर्वीही केली होती कारवाई

यापूर्वीदेखील मार्च महिन्यात वेश्यांचं रॅकेट चालवणाऱ्या 30 वर्षांच्या महिलेला ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातून अटक करण्यात आली होती. जबरदस्तीनं वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडण्यात आलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली होती. या रॅकेटच्या मास्टरमाइंडला ठाण्यातील एका प्रसिद्ध मॉलमधून पोलिसांनी अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. 

अधिक वाचा - Maharashtra School : आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरू, 15 तारखेपासून विद्यार्थ्यांना असेल एंट्री

दरम्यान, महाराष्ट्र एटीएसनंही नुकतंच मानवी तस्करीचं एक रॅकेट उघडकीला आणलं आहे. बांग्लादेशी घुसखोरांना भारतात आणण्यासाठी या रॅकेटचा वापर केला जात होता. बांग्लादेशमधील सुशिक्षित तरुणींना भारतात नोकरीचं अमिष दाखवून आणलं जात होतं आणि इथं त्यांची विक्री केली जात होती. यातील काही तरुणींनी पोलिसांत धाव घेत त्यांना या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी