Stealing Cash Box : देवळातील पैशांची पेटीवर डल्ला मारण्यापूर्वी पडला देवाच्या पाया, पहा Video

Thane Temple Cash Box Stealing :  ठाणे येथे एका भामट्याने चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यासाठी त्याने आधी देवाळातील देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर पैशांची पेटी चोरली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

thane thief breaks into temple prays to deity before fleeing with donation box watch
Video :देवळातील पैशांची पेटीवर डल्ला मारण्यापूर्वी पडला पाया 
थोडं पण कामाचं
  • ठाणे येथे एका भामट्याने चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यासाठी त्याने आधी देवाळातील देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर पैशांची पेटी चोरली.
  • या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
  • आरोपीने मंदिर तोडल्यानंतर त्याने पैशांची पेटी चोरली.

Thane Viral Video : ठाणे येथे एका भामट्याने चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यासाठी त्याने आधी देवाळातील देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर पैशांची पेटी चोरली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये असे दिसून आले आहे की, आरोपीने खोपट परिसरातील हनुमानाचे मंदिर तोडले. ही घटना 9 नोव्हेंबरची आहे.(thane thief breaks into temple prays to deity before fleeing with donation box watch) 

आरोपीने मंदिर तोडल्यानंतर त्याने पैशांची पेटी चोरली. त्यामध्ये 1 हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याबद्दलची तक्रार मंदिराची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने केली.

 

Thief touches the feet of god's idol before stealing the donation box. Who is the bigger thief? 😬

Posted by Rationalist on Friday, November 12, 2021

सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, आरोपीने चोरी करण्यापूर्वी देवासमोर नमस्कार केला. त्यानंतर तेथे असलेली पैशांची पेटी चोरली. या घटनेचे फुटेज सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले आहेत. आरोपीला नौपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याने चोरलेली रक्कम सुद्धा त्याच्याकडून जप्त केली आहे.

पोलिसांनी आरोपींना पकडले, चोरीची रोकड जप्त

दानपेटीत सुमारे एक हजार रुपये होते. ते बेपत्ता झाल्यानंतर, धार्मिक स्थळाच्या काळजीवाहूंनी पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या मदतीने शनिवारी नौपाडा पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अटक केलेल्या व्यक्तीकडून चोरीचे पैसे परत मिळवण्यात आल्याची पुष्टी एका अधिकाऱ्याने केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी