Thane : झेंडावंदनावरुन विचारे-शिंदेंमध्ये सामना, ठाकरे गटातील शिवसैनिकांना नोटीस

Shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर राज्यभरात शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट अशी विभागणी झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटीस पाठवून शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेच्या झेंडावंदनास रोखण्यात आले.

Thane: Vichare-Shinde fight over flag hoisting, notice to Shiv Sainiks of Thackeray group
Thane : झेंडावंदनावरुन विचारे-शिंदेंमध्ये सामना, ठाकरे गटातील शिवसैनिकांना नोटीस ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ठाण्यातील शिवसेना शाखेच्या झेंडा वंदनावरुन ठाकरे-शिंदे गटात आमने-सामने
  • ठाकरे गटातील शिवसैनिकांना नोटिसा
  • खासदार राजन विचारेंचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्ला

ठाणे : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप केला.  महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये राज्यभरात ठाकरे आणि शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, खा. राजन विचारे आणि काही शिवसैनिक ठाकरे गटासोबत आहे. त्यामुळे ठाण्यात विचारे आणि शिंदे अशा दोन गटात मागील काही दिवसांपासून सुप्त संघर्ष होत आहे. (Thane: Vichare-Shinde fight over flag hoisting, notice to Shiv Sainiks of Thackeray group)

अधिक वाचा : शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर, फडणवीसांनी अनेकांना दिला 'धक्का'

ठाण्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला मध्यरात्री झेंडा फडकावण्याची परंपरा आहे. गेली कित्येक दशके ही परंपरा सुरु असून स्वर्गीय आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. मात्र या वर्षी मध्यरात्रीच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटातील शिवसैनिकांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 
   

अधिक वाचा : राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात

ठाणे जिल्ह्यातील बऱ्याच शाखाही शिंदे गटाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केल्याने चंदनवाडी शाखा, जिल्हा मुख्यशाखा अद्यापही निष्ठावंत शिवसैनिकांच्या ताब्यात आहेत. दरम्यान दर वर्षी स्वातंत्रदिनाच्या पूर्व संध्येला पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे जिल्हा शाखेत ध्वजारोहण करत होते. यंदा ते मुख्यमंत्री असले तरी ठाण्यात येऊन ते ध्वजारोहण करणार असल्याने जर ठाकरे गटाचे शिवसैनिकही ध्वजारोहणाचा आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे वाटल्याने पोलिसांनी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह ठाकरे गटाच्या बऱ्याच शिवसैनिकांना नौपाडा पोलिसांनी नोटिसा पाठवल्य त्यामुळे संतप्त झालेल्या विचारे आणि दिघे यांनी आपल्या समर्थकांसह नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना जाब विचारला.

अधिक वाचा : "पप्पा, तुमची खूप आठवण येतेय” Vilasrao Deshmukh यांच्या पुण्यतिथीला सूनबाईंचे पाणावले डोळे

खा. विचारे म्हणाले, ठाकरे गटातील शिवसैनिकांना नोटीस देण्यात येत आहेत. ती शाखा शिवसेनची आहे, आम्ही शिवसैनिक आहोत. मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून नोटीसा पाठवण्यात येत आहेत. झेंडा वंदन त्यांनी करावे, मात्र काहीही झाले तरी शिव सैनिकांना यावेळी उपस्थित रहाणार आम्हाला कोणी रोखू शकत नाही. ध्वजारोहणाचा  परंपरा आनंद दिघे यांनी सुरू केली, त्यासाठी आम्ही जाणार आहोत, कितीही नोटिसा द्या आम्ही उपस्थित राहणार. झेंडा वंदन कार्यक्रमात असे राजकरण करणे ही निंदनीय बाब आहे.

अधिक वाचा :  Sanjay Rathod: भाजपच्या चित्रा वाघांनी प्रचंड विरोध केलेल्या संजय राठोडांना मिळालं 'हे' खातं..

काही झाले तरी आम्ही ध्वजारोहणाच्या  कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे उपस्थित सैनिक पोलिसांना सांगत होते तर पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाची झाली. दरम्यान, आम्ही अशी गळचेपी सहन करणार नाही असा इशारा राजन विचारे यांनी दिला असल्याने मध्यरात्री होणाऱ्या ध्वजारोहणाच्या  कार्यक्रमात राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी