Suicide: प्रेमापोटी झाला कर्जबाजारी, प्रेयसीने साधला डाव... प्रियकराने थेट मृत्यूला कवटाळलं

THANE Suicide Case: प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून एका युवकने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कळवामध्ये घडली आहे.

 thane youth commits suicide due to depression due to debt for girlfriend
प्रेयसीने साधला डाव... प्रियकराने थेट मृत्यूला कवटाळलं 
थोडं पण कामाचं
  • २६ वर्षीय तरुणाची प्रेयसीमुळे आत्महत्या
  • प्रेयसीसाठी घेतलेले कर्ज न फेडता आल्याने घेतला गळफास
  • प्रेयसीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Girlfriend: ठाणे: ठाण्यातील (Thane) कळवा पोलीस ठाण्यातील हद्दीत एका तरुणाने प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. या प्रियकराने आपल्या आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. त्यात त्याने आपल्या प्रेयसीचे नाव नमूद केले आहे. या चिठ्ठीत आपण प्रेयसीमुळे (Girlfriend) कर्जबाजारी झालो असून पैश्याची मागणी केल्यानंतर प्रेयसीकडून वारंवार पोलिसांची धमकी दिली जात होती आणि याच नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे तरुणाने सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) लिहलं आहे. (thane youth commits suicide due to depression due to debt for girlfriend)

या प्रकरणी प्रियकराच्या आईच्या फिर्यादीवरून आणि मिळालेल्या चिठ्ठीच्या सहाय्याने कळवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत. 

अधिक वाचा: सूरज पांचोली जिया खानचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता, जियाच्या आईचा आरोप

ठाण्यातील रमाबाई आंबेडकर सोसायटी, कळवा येथे राहणारा २६ वर्षीय तरुण विक्रम मोरे या तरुणाचे त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबध होते. विक्रमने प्रेयसीच्या मागणीवरून एका खाजगी फायनान्स कंपनीतून कर्ज घेतले होते. मात्र, काही महिने कर्जफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनीने कर्जफेडीचा तगदा लावला होता. 

ही बाब विक्रमने आपल्या प्रेयसीच्या लक्षात आणून देत पैसे फेडण्यासाठी प्रेयसीला सांगितले. मात्र प्रेयसीने याप्रकरणी टाळाटाळ केली आणि उलट विक्रमलाच पोलिसांची धमकी देऊ लागली. प्रेयसीसाठी घेतलेल्या पैश्यामुळे कर्जबाजारी झालेल्या विक्रमला काही सुचत नव्हते आणि फायनान्स कंपनीकडून कर्जफेडीसाठी वारंवार लावण्यात आलेला तगादा या नैराश्येतून विक्रमने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. 

आपल्यावरील दबाव आणि नैराश्य यातून तरुणाने आपल्या राहत्या घरी किचनमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विक्रम मोरे या २६ वर्षीय तरुणाचे १३वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो एका खाजगी कंपनीत काम करत होता. 

अधिक वाचा: Daughter cheated Mother : मुलीनेच दिला आईला धोका, ज्योतिषी आणि सायकॉलॉजिस्टच्या मदतीने लुटले 100 मिलियन डॉलर

विक्रम हा आपली आई, वडील आणि बहिणीसोबत या सोसायटीमध्ये राहत होता. त्याची आई नर्सचे आणि वडील हाउसकीपिंगचे काम करतात. सकाळी सगळे जण कामावर गेल्यावर विक्रमने एक चिठ्ठी लिहिली आणि गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 

या चिठ्ठी मध्ये त्याने आपल्या २० वर्षीय प्रेयसीचे नाव नमूद केले आहे. या प्रेयसीसाठी त्याने एका खाजगी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले होते आणि कर्ज न फेडल्यामुळे फायनान्स कंपनीमधून वारंवार त्याच्यामागे कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला होता. आपल्या प्रेयसीला याबाबत सांगितले असता प्रेयसीकडून उलट शिवीगाळ करून पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत होती.

अधिक वाचा: Viral: अल्पवयीन मुलीचा वेडेपणा, प्रेमासाठी HIV पॉझिटिव्ह प्रियकराचे रक्त घेतलं स्वत:च्या शरीरात

प्रेयसीमुळे भरपूर कर्जबाजारी झालो असल्याचा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आढळून आला आहे. या चिठ्ठीच्या आधारे विक्रांत यांच्या कुटुंबीयांनी प्रेयसीच्या विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणात मिळालेली चिठ्ठी आणि विक्रांतच्या कुटुंबियांच्या फिर्यादीवरून ठाण्यातील कळवा पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी प्रेयसीच्या विरोधात ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. 

या प्रकरणात निष्पक्ष तपास करून योग्य तो न्याय मिळवून देणार असल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी सांगितले. मात्र या प्रकरणी कॅमेरावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी