सिद्धीविनायक मंदिर उडविण्याची धमकी, विवियाना मॉलच्या बाथरुममध्ये आढळला संदेश 

ठाणे
Updated Jun 17, 2019 | 12:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Siddhivinayak Temple: मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर उडवून देण्याचा मेसेज ठाण्यातील विवियाना मॉलमधील एका बाथरुममध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.

siddhivinayak mandir_instagram
सिद्धीविनायक मंदिर उडविण्याची धमकी, दोन जण ताब्यात  |  फोटो सौजन्य: Instagram

ठाणे: मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर हे सुरुवातीपासूनच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिलं आहे. त्यामुळे येथील संपूर्ण परिसरात नेहमीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. पण आता पुन्हा एकदा सिद्धीविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ठाण्यातील विवियाना मॉलमधील एका स्वच्छतागृहातील भिंतीवर लिहली असल्याचं समोर आलं आहे. विवियाना मॉलमधील एका सुरक्षा रक्षकाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर याप्रकरणी तात्काळ पोलिसांना कळविण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत दोन जणांना ताब्यातही घेतलं असल्याचं समजतं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 'दुश्मन पर फतेह' अशा आशयाचा मेसेज लिहून नंतर सिद्धीविनायक मंदिर उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. किमान पाच ते सहा दिवसांपूर्वी हा मेसेज लिहल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एक संशयित हा ३० वर्षाचा असल्याचा समजतं आहे. तर दुसरा संशयित हा विक्रोळी येथील रहिवासी असल्याचं समजतं आहे. विक्रोळी येथे राहणाऱ्या या संशयिताचा मोबाइल लोकेशन हे वारंवार सिद्धीविनायक मंदिराजवळ ट्रेस झालं आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी दोन्ही संशयितांची कसून चौकशी करत आहेत. 

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराप्रकरणी धमकी देणारा मेसेज हा ठाण्यातील एका मॉलमध्ये का लिहण्यात आला याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. तसेच कुणी खोडसाळपणा केला आहे की, यामागे कुणाचा खरंच घातपाताचा कट आहे का? याचाही सध्या पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी ठाणे पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेणार असून त्याचवेळी याबाबत नेमका खुलासा होणार आहे. याबाबतचं वृत्त 'न्यूज १८ लोकमत' या वृत्तवाहिनीने दिलं आहे. 

दरम्यान, या धमकीनंतर सिद्धीविनायक मंदिराची सुरक्षा अधिक चोख करण्यात आली आहे. सिद्धीविनायक मंदिर हे दादरमधील मध्यवर्ती ठिकाणी आहे. इथं दररोज मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. यामुळे नेहमीचे या भागात पोलिसांचा बंदोबस्त असतो. पण तरीही मंदिर उडवण्याची धमकी मिळाल्यामुळे आता येथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच उरणजवळील एका पुलाखाली एक दहशतवादी मेसेज लिहिल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतलं होतं. पण या मेसेजेमुळे संपूर्ण उरण आणि पनवेल परिसरात घबराट पसरली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आता सिद्धीविनायक मंदिराबाबत असा धमकीचा मेसेज समोर आल्याने पोलिसांसमोर आव्हान आता वाढलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सिद्धीविनायक मंदिर उडविण्याची धमकी, विवियाना मॉलच्या बाथरुममध्ये आढळला संदेश  Description: Siddhivinayak Temple: मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर उडवून देण्याचा मेसेज ठाण्यातील विवियाना मॉलमधील एका बाथरुममध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles