NAVI MUMBAI मध्ये अघोरी प्रकार; पोटच्या दोन मुलांचा गळा चिरून आईने स्वत:ला लटकवलं पंख्याला पण...

Crime news : नवीमुंबई येथून एक अहोरी प्रकार समोर येत आहे. एका 32 वर्षीय महिलेने स्वत:च्या मुलांचा गळा चिरला. त्यानंतर ते सहन न झाल्याने तिने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. 

The mother killed two children by slitting their throats
NAVI MUMBAI मध्ये अघोरी प्रकार; पोटच्या दोन मुलांचा गळा चिरून आईने स्वत:ला लटकवलं पंख्याला पण...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घणसोली येथे आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या केली
  • स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
  • पतीने दिली पोलिसात तक्रार

नवी मुंबई :  घणसोली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने तिच्या पोटच्या दोन मुलांची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली समोर आली आहे. असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अघोरी प्रकारतून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (The mother killed two children by slitting their throats)

अधिक वाचा : Aurangabad: अब्दुल सत्तार यांच्या बॉलिंगवर खासदार इम्तियाज जलील क्लीन बोल्ड

घणसोली गावात चिंच आळी येथे रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलगी  टिपू वय ४ आणि राहुल वय १ असे हत्या केलेल्या लहानग्यांची नावे आहेत. पुष्पाने मुलांचा गळा चिरून स्वत:चा हात कापून घेण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य न झाल्याने तिने स्वत:ला पंख्याला लटकवून घेतले. पण ती खाली पडल्याने आवाज होताच इमारतीतील बाकीचे लोक घरी धावत आले. यानंतर घरात चार वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

अधिक वाचा : Ravi Rana : शब्द मागे घेत रवी राणा यांनी व्यक्त केली दिलगिरी, बच्चू कडू यांना केले हे आवाहन

पुष्पाने आपल्याच पोटच्या मुलांची गळा चिरून हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी आई पुष्पा गुर्जर हिला उपचारासाठी वाशीच्या महानगर पालिका रूग्णालयात दाखल केले आहे. मुलांचा वडील वेनाराम गुर्जर यांचा आईस्क्रीम विकण्याचा व्यवसाय आहे. अंधश्रद्धेला बळी पडून या महिलेने असे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.

अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने अनेक लोकांकडून अघोरी प्रकार घडतात. त्यातून बळी देणे यांसारख्या घटना समोर येतात. अंधश्रद्धेचा पगडा इतका भयंकर असतो की, स्वत:चा किंवा स्वत:च्या बाळाचा, जवळच्या व्यक्तींचा बळी देण्यासही मागे पुढे पाहिले जात नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी