मुंबई : नेहमी ठाकरे सरकार आपल्या तिरकस शैलीने बाण सोडणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमृता फडणवीस यांचे ट्विटर पाहत नाही आणि त्यांना फोलोही करत नाही, असे म्हणून अमृता फडणवीस विषय़ माझ्यासाठी महत्त्वाचा नाही हे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.
काल अमृता फडणवीस यांनी ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से ! असे एक खोचक ट्विट करून #Maharashtra #thursdayvibes हॅशटॅग केले होते. त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. पण आपण अमृता फडणीस यांचे ट्विटही पाहत नाही आणि त्यांना फॉलोही करत नाही, असे म्हणून विषय कट केला.
आज ठाण्यात सुप्रीया सुळे यांची पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रशांना उत्तर दिलीत.
माझी सगळयात मोठी समस्या महागाई आहे, मी नेहमीच महागाई विरोधात बोलत असते. महिलांना घर चालवताना काय कसरत करावी लागत आहे. अनेक पुरूष मला भेटतात तेव्हा म्हणतात ताई तेलाचा डबा ३००० रुपयांचा झाला आहे. त्यामुळे या समस्यावर विरोधक नाही तर सामन्य माणूस म्हणून बोललं पाहिजे असे मत खासदार सुप्रीया सुळे यांनी व्यक्त केले आहे.