Thane to Dombivli in just 20 minutes : प्रवाशांना आता ठाणे ते डोंबिवलीचा प्रवास होणार फक्त 20 मिनिटांत. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA)द्वारा चालू केलेले मोटागांव-माणकोली खाडी पूल 84 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होऊन हा पूल आणि रस्ता मे २०२३ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल होईल (Travel from Thane to Dombivli in just 20 minutes!)
प्रवाशांना ठाण्यावरून डोंबिवलीला पोहचायला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो आणि मुंबई-नाशिक महामार्गावरून डोंबिवलीला जाण्यासाठी कल्याणमधून जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने सिक्स लेन माणकोली पूल आणि उल्हास खाडीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा : या चुका टाळा अन्यथा नव्या नात्यात येऊ शकतो दुरावा
माणकोली-मोटागाव लिंक रोड 1.3 किमी लांबीचा आहे. गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीए या प्रकल्पावर काम करत असून महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी मंगळवारी प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.