Kalyan Station : कल्याण विट्ठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर अडकला ट्रक, अर्धा तास रेल्वे वाहतूक ठप्प

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Jan 15, 2022 | 19:39 IST

kalyan vitthalwadi station कल्याण ते विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वेचे साहित्य नेणारा एक ट्रक रेल्वे रुळात अडकला. हा ट्रक अडकल्याने रेल्वेसेवा अर्धा तास ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे कर्मचार्‍यांनी क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक हटवला.

kalyan station
कल्याण विट्ठलवाडी स्थानक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कल्याण ते विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वेचे साहित्य नेणारा एक ट्रक रेल्वे रुळात अडकला
  • रेल्वेसेवा अर्धा तास ठप्प झाली होती.
  • क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक हटवला.

Kalyan Station : ठाणे : कल्याण ते विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वेचे साहित्य नेणारा एक ट्रक रेल्वे रुळात अडकला. हा ट्रक अडकल्याने रेल्वेसेवा अर्धा तास ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे कर्मचार्‍यांनी क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक हटवला. त्यनांतर रेल्वे सेवा सुरळीत झाली. (truck stuck between kalyan vitthalwadi station transport halt for half an hour)

आज सांयकाळी पाचच्या सुमारास कल्याण कोळसेवाडी परिसरात रेल्वे यार्डात रेल्वेचे सहित्य नेणारा एक ट्रक कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकांदरम्यान रेल्वेरुळात अडकला त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ण ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटस्थाळी धाव घेतली आणि क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक हटवला. अखेर साडे पाच वाजता रेल्वे सेवा सुरूळीत झाली आणि रेल्वे प्रवाशांश प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी