आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना, विजेचा धक्का लागून 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

babasaheb ambedkar jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरुवारी रात्री विरार परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, पाच जण जखमी आहेत.

आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना, विजेचा धक्का लागून 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी
Two died due to electric shock in Virar  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीत दुर्घटना
  • विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू
  • जखमींवर नालासोपारा येथील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे : देशभरात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान, जयंतीच्या पूर्वसंध्येला एक मोठी विरार परिसरात एक मोठी दुदैवी घटना घडली. विरार पूर्वेच्या कारगिल नगरमध्ये गुरुवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Two died due to electric shock in Virar)

अधिक वाचा : Crime News : मुलगा होत नाही म्हणून सासू अन् नवऱ्याचं विचित्र कृत्य; सासूनं भोंदूबाबाशी तर नवऱ्यानं मित्राशी ठेवायला लावले संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिलला संध्याकाळी विरारच्या मनवेलपाडा ते कारगिल परिसरात रॅली काढण्यात आली होती. ज्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले होते. कारगिलमधील रॅली संपल्यानंतर लोक आपापल्या घरी परतत होते. त्यामुळे ज्या वाहनावर स्पीकर लावण्यात आले होते ते वाहन अडकले. अशा स्थितीत काही तरुणांनी त्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना विजेचा धक्का बसला.

अधिक वाचा : सूर्यदेव तळपला! विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूरमध्ये जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुण वाहनाला धक्का देत होते. त्यानंतरच त्या वाहनावर झेंडा लावण्यासाठी वापरण्यात येणारा स्टीलचा खांब ट्रान्सफरच्या संपर्कात आला. त्यामुळे सर्वांना विजेचा जोरदार धक्का बसला. जखमीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी