वांगणीतील २०० अंध कुटुंबांचा गुढीपाडवा झाला एका फेसबूक पोस्टने गोड

 मुंबईच्या लोकलमध्ये वस्तू विकून गुजराण करणाऱ्या २०० पेक्षा अधिक अंध व्यक्तींना लॉकडाऊनमुळे रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.  

vangani 200 blind family gudhi padwa facebook live
वांगणीतील २०० अंध कुटुंबांचा गुढीपाडवा झाला एका फेसबूक पोस्टने गोड 

मुंबई :  मुंबईच्या लोकलमध्ये वस्तू विकून गुजराण करणाऱ्या २०० पेक्षा अधिक अंध व्यक्तींना लॉकडाऊनमुळे रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.  रोज कमवून खाणारे हे २०० जण एकत्र वांगणी येथे राहतात. यातील बाळू शिंगारे यांनी मुंबईतील एका महिला पत्रकारांना संपर्क साधला. या महिला पत्रकाराने आपल्या फेसबूकवर या संदर्भात फेसबूक लाइव्ह करून माहिती दिली आणि या २०० अंध व्यक्तींचा गुढीपाडवा गोड झाला. 

वांगणीतल्या अंध व्यक्तींना मदतीची आवश्यकता असल्याची एक पोस्ट काल एका इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराने आपल्या पोस्ट  केली होती.  त्यानंतर अनेकांनी मदतीसाठी संपर्क साधला. पण तरीही प्रत्यक्ष मदत मिळते का हे पहायचं होतं. पण आज सकाळी एक आनंदाची बातमी मिळाली. या २०० अंध व्यक्तींचा गुढीपाडवा गोड झाला. त्यांना मदत मिळाली. 

कर्जतच्या दिशा केंद्र या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ता अशोक जंगले यांनी महिला पत्रकाराची फेसबूक लिंक घेऊन ती एका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर शेअर केली. ती अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या ग्रुपवर जावी यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी भरपूर मदत केली. ते असलेल्या अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर त्यांनी ही पोस्ट जास्तीत शेअर केली.  'व्हॉट्स अॅपवर जास्त प्रतिसाद मिळतो' हे जंगले यांचं वाक्य प्रत्यक्ष अनुभवता आलं. अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. 

जंगले यांच्या पुढाकाराने मदत 

वांगणीच्या सरपंच केतकी शेलार आणि त्यांचे पती किशोर शेलार यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. आज त्यांनी या कुटुंबांना सकाळचं जेवण दिलं. आता लॉक डाऊन संपेपर्यंत या 200 कुटुंबांना आणि त्यांच्यासारख्या गरिबांना सकाळ संध्याकाळचं जेवण देणार असल्याचे  सरपंच केतकी शेलार या पुरविणार आहेत. किशोर शेलार यांनी महिला पत्रकाराला फोन करून ही माहिती दिली. 

अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्यामार्फतही काही मदत मिळणार असल्याचं जंगले यांनी सांगितलं. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनीही जंगले यांना मदत केल्याचं कळलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...