Vasai Murder : ठाणे : वसई रोड स्थानकावर एका व्यक्तीने आपल्या बायकोला धावत्या रेल्वेखाली ढकलले होते. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. बायकोला रेल्वेखाली फेकल्यानंतर पतीने घटनास्थळाहून पळ काढला होता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पत्नीला रेल्वेखाली का फेकले याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. (vasai road railway station man arrested after he throw wife in front of train)
अधिक वाचा : Beed: विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवायला गेला बाप, मिठी मारल्यानं दोघांचाही बुडून मृत्यू
#Mumbai: A man, in his 30s, threw his sleeping wife in front of a speeding long distance train at #Vasai railway station and fled with his two minor children on Monday morning. Search launched for him. pic.twitter.com/XRL2rOdQbt — TOI Mumbai (@TOIMumbai) August 22, 2022
मिळालेल्या माहितीनुसार मेहंदी हसन या ३८ वर्षीय व्यक्तीचे नूरसिना या महिलेसोबत लग्न झाले होते. दोघांना पाच आणि दीड वर्षाचे असे दोन मुले आहेत. नूरसिनाचे एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. काही दिवसांपूर्वी नूरसिना आपल्या पतीला आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत रहायला गेली. तसेच आपल्या पतीकडे येण्यास तिने नकार दिला. परंतु मुलांना सारखी आपल्या आईची आठवण येत होती, पती मेहंदी हसनने कशीबशी समजूत काढून तिला घरी आणले. रविवारी ती पुन्हा घर सोडून गेली, तेव्हा मेहंदी हसनने तिला फोना केला आणि घरी येण्यास सांगितले, तेव्हा तिने नकार दिला.
त्यानंतर नूरसिनाने आपण वसई रेल्वे स्थानकावर असल्याचे सांगितले. तेव्हा मेहंदी हसन दोन्ही मुलांसह वसई रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेव्हाही मेहंदी हसनने नूरसिनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु नूरसिना ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हती. अखेर नूरसिना घरी येणार नसल्याचे मेहंदी हसनला कळाले. तेव्हा पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी वसई रेल्वे स्थानकावरून अवध एक्सप्रेस येत होती, तेव्हा मेहंदी हसनने नूरसिनाला उठवले आणि प्लॅटफॉर्मच्या कडेला नेले. ट्रेन जशी जवळ आली तसे मेहंदीने नूरसिनाला रुळावर ढकलले. गाडी वेगात असल्याने नूरसिनाच्या अंगावरून गाडी गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. बायकोला ढकलल्यानंतर मुलांना घेऊन मेहंदी हसनने घटनास्थळाहून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
सीसीटीव्हीतील फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मेहंदी हसनचा शोध घेतला. मेहंदी हसन ट्रेनने वसईहून कल्याणला पोहोचला आणि कल्याणहून रिक्षा करून भिवंडीला पोहोचला. पोलिसांनी मेहंदी हसनचा शोध घेण्यासाठी रिक्षा युनियनच्या लोकांची मदत घेतली आणि त्याला शोधून काढले. पोलिसांनी मेहंदी हसनला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्या दोन्ही मुलांना हसनच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केले आहे.