Raj Thackeray : का म्हटले राज  ठाकरे भाकरी करपली... 

ठाणे
Updated Oct 15, 2019 | 21:31 IST | प्रशांत जाधव

Raj Thackeray : कल्याण डोंबिवलीची ओळख ही स्मार्ट लोकांची बकाल शहरं अशी झाली आहे. ही काय ओळख आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीच्या खड्ड्यांवर चांगले तोंडसुख घेतले. 

vidhansabha election 2019 raj thackeray mns dombivali rally full speech news in marathi
भाकरी का करपली, कारण उलटी नाही - राज ठाकरे   |  फोटो सौजन्य: फेसबुक

डोंबिवली :  भारतातून सर्वात जास्त सीए हे डोंबिवलीतून येतात. पण शहराचे अकाउंट कधी चेक केले नाही. त्यामुळे हे शहर बकाल झाले आहेत. काय अवस्था करून ठेवली आहेत या शहराची, अशी शहरं नसतात, परदेशात जा पहा शहरं कशी असतात. आपल्या माता भगिनींना माहिती भाकरी का करपली, कारण ती उलटी नाही. कोणी ही असो त्याने विकास केला नाही, अगदी माझी माणसं जरी असली तरी त्यांनाही बदलणं आवश्यक आहे, तरच या शहराचा विकास होऊ शकतो नाही तरी ही शहरं अशी बकाल राहतील, असे कळकळीची विनंती डोंबिवलीची मतदारांना केली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली मतदार संघासाठी डोबिंवलीत जाहीर सभा होती. यावेळी राज ठाकरे यांनी डोंबिवली शहरातील बकालपणावर सडकून टीका केली. डोंबिवली शहराची ओळख काय तर सुशिक्षित लोकांचे बकाल शहरं, या शहरातून अनेक उच्चशिक्षित लोक परदेशात जातात. तेथे स्थायिक झाले आहेत. भारतातील सर्वाधिक सीए हे या शहरातून आले आहेत. पण या शहराचं अकाउंट कधी चेक झाले नाही आणि शहर बकाल होत गेले, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण

 

 

ज्या पद्धतीने शहरांकडे लक्ष्य दिले पाहिजे तसे दिले गेले नाही. त्यामुळे शहराचा कधी विकासच झाला नाही. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोंढ्यांना वाटते की अरे हे तर आपल्या शहरा सारखंच आहे. तर काय ओळख आहे ही या ठाणे जिल्ह्यातील शहरांची... तुम्हांला या परिस्थितीचा राग कसा येत नाही. तुम्ही तुमच्या नगरसेवकाला, आमदाराला का प्रश्न विचारत नाही. लोकं खड्ड्यात पडून मरताहेत त्याचं कोणाला सोयरसुतक नाही. दुसऱ्याच्या घरी दुःख झालं ना आम्हांला काय करायचे एवढी लोकसंख्या आहे. एक-दोन गेले तरी काही फरक पडत नाही. आपल्या सर्वांची मनं मरून गेली आहेत, त्यामुळे या सर्व व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी सक्षम असा विरोधी पक्ष हवा, तो असेल तरच तुमचे प्रश्न सुटतील, त्यामुळे यावेळी सक्षम विरोधी पक्षासाठी माझ्या उमेदवारांना साथ देण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी यावेळी केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी