प्रवाशाची चूक, लोको पायलटने जीव धोक्यात घालून सुधारली आणि ट्रेनचा प्रवास सुरळीत झाला

ठाणे
रोहन जुवेकर
Updated May 07, 2022 | 15:11 IST

viral video train stopped on the river bridge was started by loco pilot : कल्याण ते गोरखपूर या लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या प्रवासादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

viral video train stopped on the river bridge was started by loco pilot
प्रवाशाची चूक, लोको पायलटने जीव धोक्यात घालून सुधारली आणि ट्रेनचा प्रवास सुरळीत झाला 
थोडं पण कामाचं
  • प्रवाशाची चूक, लोको पायलटने जीव धोक्यात घालून सुधारली आणि ट्रेनचा प्रवास सुरळीत झाला
  • कल्याण ते गोरखपूर या लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या प्रवासादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल
  • टिटवाळा आणि खडवली दरम्यान उल्हास नदीवरच्या पुलावर ट्रेन थांबली

viral video train stopped on the river bridge was started by loco pilot : ठाणे : कल्याण ते गोरखपूर या लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या प्रवासादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. प्रवाशाची चूक सुधारण्यासाठी लोको पायलटने स्वतःचा जीव धोक्यात घातला पण ट्रेनचा प्रवास सुरू राहील याची खबरदारी घेतली. यासाठीच कल्याण ते गोरखपूर या ट्रेनच्या लोको पायलटचे कौतुक होत आहे.

प्रवाशाने चुकून चेन खेचली यामुळे टिटवाळा आणि खडवली दरम्यान उल्हास नदीवरच्या पुलावर ट्रेन थांबली. लोको पायलटने जीव धोक्यात घालून चेन खेचल्यामुळे लागलेला ब्रेक ओपन केला. नंतर ट्रेन पुढच्या प्रवासाला रवाना झाली. प्रवाशांनी भरलेली ट्रेन पुढचा प्रवास सुरळीत करू शकली. 

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये बरेली येथे चहा पिण्यासाठी लोको पायलटने सिस्वान फाटकाजवळ अधिकृत थांबा नसूनही ट्रेन थांबविली होती. दुसऱ्या घटनेत उत्तर प्रदेशातील बरेली जंक्शन येथे उन्हाळ्यामुळे वैतागलेला लोको पायलट मालगाडी मध्येच सोडून निघून गेला. हा पायलट ओव्हरटाईम ड्युटीवर नाराज होता. या दोन घटनांमध्ये संबंधित लोको पायलटना रेल्वेने जाब विचारला आहे. उत्तर ऐकून घेतल्यानंतर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या दोन घटनांनंतर महाराष्ट्रात लोको पायलट चर्चेत आला आहे. पण यावेळी लोको पायलटच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

प्रवाशाने चेन खेचल्यामुळे ट्रेन उल्हास नदीच्या पुलावर उंचावर थांबली होती. पुलावरच्या रुळावरून पाय घसरला असता अथवा कळत नकळत खाली लक्ष गेल्यामुळे चक्कर आली असती तर नदीत पडण्याचा धोका होता. हा धोका पत्करून लोको पायलटने अलार्मिंग चेन खेचल्यामुळे लागलेला ब्रेक ओपन केला. यामुळे अलार्म वाजणे थांबले आणि गाडी पुढे जाण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या तयार झाली. नंतर लोको पायलटने तातडीने ट्रेन नियोजनानुसार पुढे नेली. ट्रेनचा पुढचा प्रवास सुरळीत पार पडला. 

कल्याण - गोरखपूर गोदान एक्सप्रेसचे लोको पायलट सतीश कुमार यांनी जीव धोक्यात घालून अलार्म चेन रिसेट केली. यामुळे चेन खेचल्यानंतर थांबलेली ट्रेन पुढच्या प्रवासाकरिता सज्ज झाली.

रेल्वेच्या कलम १४१ नुसार आपात्कालीन कारणाशिवाय चेन खेचणे हा गुन्हा आहे. या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला बारा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा अथवा एक हजार रुपयांचा दंड अथवा तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी