Thane Water cut: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, ठाण्यातील काही भागात शुक्रवारी म्हणजे 24 मार्च रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. हा पाणी पुरवठा एकूण 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे तसेच पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेण्यात आले आहे.
हे पण वाचा : अंजीर खा आणि केस वाढवा
या कामानिमित्त शुक्रवार 24 मार्च 2023 दुपारी 12 वाजल्यापासून ते शनिवार 25 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत असा एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, मुंब्रा प्रभाग समिती मधील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसरापर्यंत व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील.
हे पण वाचा : चटपटीत भेळपुरी बनवा घरच्या घरी, जाणून घ्या सोपी पद्धत
पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.