Navi Mumbai Water logging : नवी मुंबईत विमानतळाच्या भरावाच्या कामाने गावात पाणी शिरले, नागरिकांचे अतोनात नुकसान

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Jul 05, 2022 | 22:12 IST

सततच्या पडणाऱ्या पावसाने आणि विमानतळाच्या भरावामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दीड ते दोन फूट पाणी साचले आहे. तर काहींच्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

थोडं पण कामाचं
  • सततच्या पडणाऱ्या पावसाने आणि विमानतळाच्या भरावामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दीड ते दोन फूट पाणी साचले आहे.
  • तर काहींच्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
  • गेल्या तीन ते चार वर्षांपासून डुंगी गावात पाणी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

Navi Mumbai Water logging : नवी मुंबई : सततच्या पडणाऱ्या पावसाने आणि विमानतळाच्या भरावामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दीड ते दोन फूट पाणी साचले आहे. तर काहींच्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. (water logging due to new mumbai airport in dungi village)

गेल्या तीन ते चार वर्षांपासून डुंगी गावात पाणी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. विमानतळाचा भरावामुळेच गावात पाणी भरल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. गेल्या वर्षी सुद्ध मोठ्या प्रमाणात पाणी घरांमध्ये शिरले होते. त्याचा फटका नागरिकांना बसला होता. कित्येकांचे हजारो रुपयांचे नुकसान या पाण्यामुळे झाले होते.

मात्र या विमानतळासाठी होत असलेल्या भरावामुळे दरवर्षी पूरग्रस्त परिस्थिती उद्भवत आहे. येथील नागरिकांच्या राहत्या घरात पाणी जाऊन अतोनात नुकसान होत आहे. डुंगी गावाच्या अगदी लगत करण्यात आलेल्या विमानतळाच्या भरावामुळे गावापेक्षा भराव हा उंचीवर गेला आहे. भरावानंतर झालेल्या गेल्या वर्षीच्या पावसात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल या भीतीने ग्रामस्थ चिंताग्रस्त असतात. सिडको प्रशासनाने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ प्रमोद नाईक यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी