Sharad Pawar : भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र यावे, आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीवर पवार यांचे सूचक वक्तव्य

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Aug 29, 2022 | 16:26 IST

देशात ईडी आणि सीबीआयचा गैरवापर सुरू आहे, केंद्रीय सस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसेच आगामी निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र यावे असे सूचक वक्तव्यही पवार यांनी केले आहे.

sharad pawar
शरद पवार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशात ईडी आणि सीबीआयचा गैरवापर सुरू आहे,
  • केंद्रीय सस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे
  • आगामी निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र यावे असे सूचक वक्तव्यही पवार यांनी केले आहे.

Sharad Pawar : ठाणे : देशात ईडी आणि सीबीआयचा गैरवापर सुरू आहे, केंद्रीय सस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसेच आगामी निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र यावे असे सूचक वक्तव्यही पवार यांनी केले आहे. (will unite opposition party against bjp says ncp chief sharad pawar in thane read in marathi)

अधिक वाचा -ED ची नजर आता पवार कुटुंबियांवर, आमदार रोहित पवार आता रडारवर

आज ठाण्यात शरद पवार यांनी पदाधिकार्‍यांची बैठक घेतली आणि त्यांच्याकडून ठाण्याचे प्रश्न ऐकून घेतले. त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा पवार म्हणाले की, २०१४ साली भाजपने मोठमोठी आश्वासनं दिली होती, यापैकी भाजपने कुठलीही आश्वासनं पूर्ण केली नाही. २०२२ पर्यंत सर्वांना पक्की घरं मिळतील, गावागावांत इंटरनेट दिले जाईल अशी भाजपने घोषणा केली होती. परंतु भाजपने ही आश्वासनं पूर्ण केली नाहीत. भाजप केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पवार म्हणाले. नवाब मलिक हे नेहमी भाजपविरोधात बोलत होते त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. सामनाचे कार्यकारी संपादक सामनातून भाजपला विरोध करत होते. भाजपने आज त्यांची काय अवस्था केली हे सगळ्यांना माहित असेही पवार म्हणाले. 

 
#Live Now राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या पत्रकार परिषदेचे ठाणे येथून थेट प्रक्षेपण Posted by Nationalist Congress Party - NCP on Monday, August 29, 2022

भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी माझी भूमिका आहे असे पवार म्हणाले. परंतु या विरोधी पक्षांचे नेतृत्व माझ्याकडे असले पाहिजे असा माझा आग्रह नाही, मी आता कुठलीही सक्तीची भूमिका घेणार नाही असेही पवार म्हणाले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नावर पवार म्हणाले की शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे यावर राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे, परंतु यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले आहे. तसेच ठाण्याने नेहमी एक सुसंस्कृत नेतृत्व राज्याला दिले आहे. त्यात खंडू रांगणेकर, विमलताई, प्रभाकर हेगडे हे लोक समाजाची एक विशिष्ट विचारधारा घेऊन विशिष्ट दर्जाने समाजकारण आणि राजकारण करणारे नेतृत्व होतं. असे नेतृत्व पुन्हा यावे याची काळजी ठाणेकरांनी घ्यावी असे आवाहनही पवार यांनी केले. 

Nitin Gadkari : विहिरीत उडी मारून जीव देईन पण, नितीन गडकरी असे का म्हणाले? वाचा सविस्तर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी