Raju Patil : कल्याण : राज्यसभेच्या निवडणुक जवळ आल्याने प्रत्येक आमदाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक आमदाराचे मत महत्त्वाचे या सुत्रानुसार महाविकास आघाडी आणि भाजपने अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी मनसेचे एकमेव आमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्या प्रमाणे आदेश देतील त्या प्रमाणे मतदान करू अशी माहिती राजू पाटील यांनी दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीपूर्वी राजू पाटील नॉट रिचेबल झाले होते, त्यावर अपाटील म्हणाले की, काल माझी तब्येत ठीक नसल्याने आराम करीत होतो. तसेच शनिवारी प्रशासकीय काही कामं नव्हती त्यामुळे घरी आराम करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच नॉट रीचेबल असणे किंवा मला कुठेही घेऊन जाणे हे माझ्या बाबतीत होणार नाही.असे सांगत मनसेची भूमिका तटस्थ असून जेव्हा फ्लोर टेस्टिंग झाली तेव्हा आम्ही तटस्थ राहिलो आता मागच्या वेळेस छत्रपती संभाजीराजेंचा फोन आला होता. त्यावेळेस राज साहेबांचा आदेश घेऊन त्यांच्या नॉमिनेशन फॉर्मवर सही पण केली होती. परंतु ह्या क्षणाला तरी मला राज साहेबांकडून काही आदेश आला नाहीये त्यामुळे ते जसे सांगतील त्याप्रमाणे पुढे वाटचाल असेल. मतदान कुणाला करायचं की तटस्थ रहायचे हा सर्वस्वी पक्षाचा विषय आहे. त्यामुळे राज साहेब सांगतिल त्याप्रमाणे आम्ही मतदान करू किंवा तटस्थ राहू अशी भूमिका पाटील यांनी यावेळी मांडली