woman dead and two injured as ground plus one-storey structure collapses in Bhiwandi : भिवंडी : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे गौसिया मशिदीजवळच्या शांती नगरमध्ये एक दुर्घटना घडली. यात महिलेचा मृत्यू झाला आणि २ पुरुष जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
भोंगा वाजवल्यावर राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्यावर राग कशाला येतो? : फडणवीस
एक मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लोरिंग आणि तळमजल्याचा स्लॅब तळमजल्यावर झोपलेल्यांच्या अंगावर पडला. यामुळे गुलशन सगीर अन्सारी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला ४५ वर्षांची होती. भिवंडीच्या या दुर्घटनेत सगीर खलील अन्सारी (४५) आणि मेहताब अन्सारी (३०) हे दोघे जखमी झाले. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ढिगाऱ्याखाली पाच जण दबले होते त्यापैकी दोघांना अग्नीशमन दलाच्या जवानांनी वाचविले ते सुरक्षित आहेत. इतर तीन जणांना ढिगाऱ्याखालून काढल्यानंतर थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिघांपैकी महिलेचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आणि इतर दोघांवर उपचार सुरू केले; अशी माहिती पोलिसांनी दिली.
दुर्घटनेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. बेकायदा बांधकाम झाले होते का आणि बांधकामाचा दर्जा निकृष्ट होता का याचीही तपासणी सुरू आहे.