Bharat mata pooja । भारतमातेच्या पूजेला महिलेचा विरोध.. सुरक्षारक्षकांना मारहाण करून, फोडले मोबाईल...

ठाणे
प्रशांत जाधव
Updated Jan 27, 2022 | 13:42 IST

एकीकडे काल संपूर्ण देशात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला तर दुसरीकडे ठाण्यातील एका घटनेने या कार्यक्रमाला गालबोट लागले.

Woman opposes worship of Mother India Beating security guards, smashed mobile
Bharat mata pooja । भारतमातेच्या पूजेला महिलेचा विरोध 
थोडं पण कामाचं
  • एकीकडे काल संपूर्ण देशात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला तर दुसरीकडे ठाण्यातील एका घटनेने या कार्यक्रमाला गालबोट लागले.
  • घटना ठाण्यातील कोलशेत भागात असलेल्या लोढा अमारा या उच्चभ्रू सोसायटीतील असून इथे आज सकाळी भारतमातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  • येथील रहिवासी्यांनी एकत्र येत हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु याचं वेळी तेथेच राहणाऱ्या एका महिलेने भारतमातेचा फोटो हिसकावून घेतला आणि  मोठा हंगामा केला. 

Viral video in Thane ।  ठाणे :  एकीकडे काल संपूर्ण देशात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला तर दुसरीकडे ठाण्यातील एका घटनेने या कार्यक्रमाला गालबोट लागले. घटना ठाण्यातील कोलशेत भागात असलेल्या लोढा अमारा या उच्चभ्रू सोसायटीतील असून इथे आज सकाळी भारतमातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील रहिवासी्यांनी एकत्र येत हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु याचं वेळी तेथेच राहणाऱ्या एका महिलेने भारतमातेचा फोटो हिसकावून घेतला आणि  मोठा हंगामा केला. 

अधिक वाचा : ​१९ पेक्षाही कमी वयाच्या या ५ क्रिकेटर्सवर लागणार मोठी बोली

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कॉम्प्लेक्सच्या सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले, परंतु सदर महिलेने फोटो देण्यास नकार दिला. एका महिला सुरक्षाकर्मचारीने फोटो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताच सदर महिलेने तिच्यावर जोरदार हल्ला करत तिला मारहाण केली. तिला अडविणाऱ्या अनेक सुरक्षारक्षकांना देखील सदर महिलेने मारहाण करत चित्रीकरण करणाऱ्यांचे मोबाईल फोडले. 

अधिक वाचा : Ayushman Bharat Card वर मिळतील अनेक सुविधा!

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कापूरबावडी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिच्यावर याआधी गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. सदर महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे काहींनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी