Women Looks Good Without Clothes: महिलांनी काहीच घातलं नाही तरी त्या छान दिसतात; योगगुरूचं वादग्रस्त विधान

ठाणे
भरत जाधव
Updated Nov 25, 2022 | 17:25 IST

महिलांनी (women) साडी नेसली तरी छान दिसतात. सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात. माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छानच दिसतात, असं विधान रामदेव बाबांनी बोलण्याच्या भरात केलं आहे.

Women look good even if they don't wear anything; ramdev Baba
अर्रर देवा! महिलांविषयी काय बोलून गेले रामदेव बाबा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ठाणे येथे एका संमेलनात रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले आहे.
  • महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले होते, त्यासाठी त्यांनी साड्या आणल्या होत्या.
  • महिला ड्रेस (सलवार सूट) मध्येसुद्धा चांगल्या अमृता फडणवीस यांच्यासारख्या चांगल्या वाटतात - रामदेव बाबा

ठाणेः योगगुरू बाबा रामदेव (Ramdev Baba) अनेकवेळा आपल्या विधानामुळे चर्चेत राहत असतात. आताही ते ठाण्याच्या कार्यक्रमात त्यांनी महिलांविषयी केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत.  महिलांनी 
(women) साडी नेसली तरी छान दिसतात. सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात. माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छानच दिसतात, असं विधान रामदेव बाबांनी बोलण्याच्या भरात केलं आहे. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावरून आता प्रचंड टीका होऊ लागली आहे.  दरम्यान, सोशल मीडियावर (Social media) त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. (Women look good even if they don't wear anything; ramdev Baba)

अधिक वाचा  : झुंड चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याला बेड्या

ठाणे येथे एका संमेलनात रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते. त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला.  त्यांना  लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. त्यावेळी बोलण्याच्या भरात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. 

अधिक वाचा  : IND vs NZ: टॉमच्या वादळासमोर भारताची शरणागती

नेमकं काय म्हणाले?

उपरोक्त संदर्भाने बाबा रामदेव यांनी हिंदीत एक विधान केले. ते म्हणाले, साड्या नेसायला नाही मिळाल्या काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला ड्रेस (सलवार सूट) मध्येसुद्धा चांगल्या अमृता फडणवीस यांच्या सारख्या चांगल्या वाटतात आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं वक्तव्य राम देव बाबा यांनी केलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी