Thane Crime News : लग्नाला नकार दिला म्हणून महिलेच्या पोटात खुपसला चाकू, पोलिसांकडून गुन्हा दाखल

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Sep 22, 2022 | 09:59 IST

Thane Crime News : ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून एका व्यक्तीने महिलेच्या पोटात चाकू खुपसला आहे. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

लग्नाला नकार दिला म्हणून महिलेच्या पोटात खुपसला चाकू
women refused to get married colleague stab her in thane   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • लग्नाला नकार दिला म्हणून एका व्यक्तीने महिलेच्या पोटात चाकू खुपसला आहे.
  • यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Thane Crime News : ठाणे : ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून एका व्यक्तीने महिलेच्या पोटात चाकू खुपसला आहे. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (women refused to get married colleague stab her in thane fir file in police)

अधिक वाचा : Mumbai: 20 वर्षीय तरुणीवर आजोबा आणि काकांनी केला बलात्कार, 12 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

मिळलेल्या माहितीनुसार एक २७ वर्षीय महिला नवी मुंबईच्या एका सलूनमध्ये काम करत होती. या महिलेचे लग्न झाले होते. परंतु पतीसोबत भांडण झाल्यापासून ती वेगळी राहत होती. आरोपी आणि महिला या सलूनमध्ये काम करत होते. आरोपीने महिलेला लग्नासाठी अनेक वेळेला विचारले होते, परंतु आपले आधीच लग्न झाल्याचे सांगून महिलेने लग्नाला नकार दिला होता. 

अधिक वाचा :  Shiv Sena: 'आमदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो, पण विकले गेलेले...', उद्धव ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा


मंगळवारी आरोपी आणि महिलेची भेट झाली. एकत्र ऑफिसवर जाऊ असे सांगत आरोपीने महिलेला बाईकवर महिलेला ऑफिससाठी नेले. नंतर काही अंतरावर मुंब्रा पनवेल मार्गावर आरोपीने बाईक थांबवली आणि महिलेला पुन्हा लग्नासाठी गळ घातली. तेव्हाही महिलेने लग्नाला नकार दिला. तसेच आपेल आधीच लग्न झाल्याने आपण पुन्हा लग्न नाही करू शकत असे कारण या महिलेने दिले. महिलेने लग्नासाठी नकार दिला म्हणून आरोपीच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने सोबत आणलेला चाकू महिलेच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. आरोपीने महिलेकडून मोबाईल हिसकावला आणि घटनास्थळाहून पळ काढला. 

अधिक वाचा :  Shiv Sena Melava: मुंबई संकटात असताना ही गिधाडं कुठे असतात, उद्धव ठाकरेंचा शहांना सवाल

त्यानंतर महिलेला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी महिलेवर उपचार केले असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीविरोधात खून करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

अधिक वाचा : Mumbai Accident: घाटकोपरमध्ये भीषण अपघात; ओला गाडीची 8 जणांना धडक, LIVE VIDEO आला समोर


दिल्ली आणि आसामध्येही समान घटना

आसाममध्ये एका अल्पवयीन मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिला जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. दिल्लीतही अल्पवयीन मुलीने सोशल मीडियावर चॅट करण्यास नकार दिला म्हणून नराधम आरोपीने तिला गोळी घातली होती. गेल्या काही दिवसांत अशा घटना वाढल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी