कल्याण : शहरातील नामांकित कपड्याचे दुकान हेरून या दुकानातून महागडे कपडे चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. कल्याणातील एका दुकानातून ३२ हजाराचे कपडे चोरताना हे टोळके सीसीटीव्हीत कैद झाले आहे. बाजारपेठ पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरु केला असून या टोळीत ५ महिला आणि दोन पुरुषाचा समावेश आहे.
अधिक वाचा : अदानी-अंबानींना लागला मंगळ...संपत्तीत मोठी घट
उल्हासनगर परिसरात गर्दीचा फायदा घेत दुकानातून वस्तू आणि कपड्याची चोरी करणारी टोळी सक्रीय असून आता या टोळीने कल्याणात देखील दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पश्चिमेकडील केशाज लेडीज गारमेट दुकानात संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आलेल्या ७ जणांच्या टोळक्याने दुकानातील सेल्समनला कपडे दाखविण्यास सांगत या सेल्समनची नजर चुकवून ३२ हजार रुपये किमतीचे ब्रान्डेड लेडीज ड्रेस चोरले.
अधिक वाचा : 'त्रिकुटाने' मुख्यमंत्र्यांची बैठक लावून लायकी सिद्ध करावी
विशेष म्हणजे यातील एक महिला कॅमेऱ्यासमोर ड्रेस पाहण्याचा बहाणा करून उभा धरत या ड्रेसच्या मागे दुसरी महिला साडीच्या आत ड्रेस भरून घेताना दिसत आहे. एक महिला पाच ड्रेस काही क्षणात साडीच्या आत लपवत काहीच घडले नाही या आविर्भावात वावरताना सीसीटीव्हीत दिसत असून हे सराईत चोरटे असल्याचे पोलिसाचे म्हणणे आहे.
याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोद्वण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे बाजारपेठ पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.