कोपर-दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून तरूणीचा मृत्यू

ठाणे
Updated Jul 22, 2019 | 12:34 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सविता ही ३० वर्षीय तरूणी डोंबिवलीवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करत होती. यावेळी कोपर ते दिवा स्थानकादरम्यान लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तिला आपला तोल सांभाळता आला नाही.

local train
लोकल ट्रेन 

थोडं पण कामाचं

  • वाढत्या गर्दीचा बळी
  • लोकलमधून पडून तरूणीचा मृत्यू
  • कोपर-दिवा स्थानकादरम्यान घडली घटना

मुंबई: मुंबईतील लोकलची गर्दी ही नेहमीचीच. लोकसंख्या वाढतेय, शहरात लोंढेच्या लोढें वाढत आहेत. याचा परिणाम लोकलच्या गर्दीवर. दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी मात्र प्रचंड वाढत चालली आहे. यातूनच दररोज या गर्दीने बळी जातात. सकाळी आणि संध्याकाळची वेळ म्हणजे लोकलमधील गर्दीमध्ये पाय ठेवण्यास जागा नसते. याच रोजच्या जीवघेण्या गर्दीतून नोकरदार व्यक्ती आपले ऑफिस गाठत असतात. मात्र काहीजण या गर्दीचा बळी ठरतात आणि आपला जीव कायमचा गमावून बसतात. 

इतर आजारांमुळे कमी मात्र गर्दीमुळे जीव जाणाऱ्यांची संख्या निश्चितच मोठी म्हणावी लागेल.अशीच एक घटना आज कोपर ते दिवा स्थानकादरम्यान घडली. सविता नाईक या ३० वर्षीय तरूणीला वाटलेही नव्हती ही काळ तिला इतक्या लवकर ओढून नेईल. नेहमीप्रमाणे ती डोंबिवलीवरून सीएसटीच्या दिशेने प्रवासासाठी निघाली खरी मात्र हा प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला. घरच्यांचा रोजच्याप्रमाणे निरोप घेऊन ती निघाली खरी मात्र तो निरोप तिच्यासाठी शेवटचा ठरला. वाढत्या लोकलच्या गर्दीचा ती बळी ठरली. 

सविता ही ३० वर्षीय तरूणी डोंबिवलीवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करत होती. यावेळी सकाळच्या वेळेस डोंबिवलीवरून चढताना लोकांना प्रचंड कसरत करावी लागते. याआधीच्या स्थानकांवरून गाडी भरून आल्याने त्यांना बऱ्याचदा ठाण्यापर्यंत दरवाज्यावर लटकतच प्रवास करावा लागतो. अशातच ती लोकलमध्ये चढली मात्र तिला आत काही जाता येईना. 

यावेळी कोपर ते दिवा स्थानकादरम्यान लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तिला आपला तोल सांभाळता आला नाही. तिचा या गर्दीने तोल गेला आणि ती रुळावर पडली. यातच तिचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे पथक तातडीने तेथे दाखल झाले. सविता डोंबिवलीत राहत होती. यावेळी तिचा मृतदेह डोंबिवलीत आणला जात आहे. 

गर्दीच्या वेळेस सकाळी नोकरींच्या वेळेमध्ये गाडीत चढायलाही जागा नसते. यावेळी अनेकदा आपल्या जीवावर बेतून अनेक जण प्रवास करत असतात. मात्र नोकरी काय पुन्हा भेटेल मात्र आयुष्याचे काय. ते तर एकदाच भेटते ना. त्यामुळे एखादी गाडी चुकली तर दुसरी येईल. मात्र आयुष्य काही परत मिळणार नाही. नोकरीपायी स्वत:चे आयुष्य असे संपवू नका. दरम्यान, या घटना रेल्वे प्रशासनाला काही नवीन नाहीत. मात्र या गर्दीवर तोडगा काढणे तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून गर्दीमुळे जाणाऱ्या बळींची संख्या कमी होईल. गर्दीमुळे नाहक जीव जाणाऱ्यांचे प्रमाण घटेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
कोपर-दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून तरूणीचा मृत्यू Description: सविता ही ३० वर्षीय तरूणी डोंबिवलीवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करत होती. यावेळी कोपर ते दिवा स्थानकादरम्यान लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तिला आपला तोल सांभाळता आला नाही.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...