Amruta Fadanvis : भिडे गुरूजी हिंदुत्वाचा स्तंभ त्यांनी महिलांचा आदर करावा - अमृता फडणवीस

ठाणे
Updated Nov 04, 2022 | 09:13 IST

Amruta Fadanvis : भिडे गुरुजींबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु महिलांनी कसे जगावे त्यांनी सांगू नये, त्यांनी महिलांचा आदर करावा असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच पुढच्या वर्षी पुढच्या आषाढी एकादशीला आम्ही नक्की येऊ असेही फडणवीस म्हणाल्या.

थोडं पण कामाचं
  • भिडे गुरुजींबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु महिलांनी कसे जगावे त्यांनी सांगू नये,
  • त्यांनी महिलांचा आदर करावा असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
  • तसेच पुढच्या वर्षी पुढच्या आषाढी एकादशीला आम्ही नक्की येऊ असेही फडणवीस म्हणाल्या.

Amruta Fadanvis : सोलापूर : भिडे गुरुजींबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु महिलांनी कसे जगावे त्यांनी सांगू नये, त्यांनी महिलांचा आदर करावा असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच पुढच्या वर्षी पुढच्या आषाढी एकादशीला आम्ही नक्की येऊ असेही फडणवीस म्हणाल्या. (bhide guruji should respect women says devendra fadanvis wife amruta fadanvis)

अधिक वाचा : Dharmveer Sequel  : दिघेंच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार? 2024 ला येणार धर्मवीरचा पार्ट -2

तु आधी कुंकू किंवा टिकली लावून ये मग बोलू असे भिडे गुरूजींनी एका महिला पत्रकाराला सुनावले होते, त्यामुळे राज्यात एकच गदारोळ झाला होता. भिडे गुरुजींवर अनेक महिलांनी टीका केली होती. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की,  भिडे गुरुजी हे हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला खूप आदर आहे. परंतु या प्रकारे महिलांनी कसे जगावे हे ते सांगू शकत नाहीत. महिलांचे एक जीवनशैली असते. त्या प्रकारे ती जगते तिचा आदर करावा. भिडे गुरुजींनीही महिलांचा आदर करावासे अमृता फडणवीस म्हणाल्या. 

अधिक वाचा :  BMC Contract : मुंबईला खड्डेमुक्त करण्याची योजना लांबणीवर, 5800 कोटी रुपयांचे कंत्राट मुंबई महानगरपालिकेकडून रद्द

तसेच आम्ही पंढरीमध्ये आलो, वारकऱ्यांसह फुगडी खेळली. त्यांच्याबरोबर ताल धरला यात खूप आनंद मिळाला. मध्यरात्री शिव विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा आमच्या हस्ते होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांचे जीवन सुखी होवो, शेतकऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण होवो, शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व समस्या दूर व्हावे, कर्ज दर कमी होवो, अशी मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेकडे करणार असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. आषाढी व कार्तिकीची पूजा करण्याचा मान आपणास मिळाला आहे, पुढच्या आषाढीत विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येण्याची आपली इच्छा आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी अमृता फडवणीस यांना विचारला. यावर त्या म्हणाल्या विठ्ठलाची पूजा करण्यासाठी आम्ही कोणत्याही महिन्यात पंढरपूरला येऊ शकतो त्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा नाही असेही फडणवीस यांनी नमूद केले. 

अधिक वाचा :  Bharat Jodo Yatra : ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं; ऐका घटनाक्रम दस्तुरखुद्द नितीन राऊतांकडून…

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी