डोंबिवली : जिममध्ये राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते भिडले, घटनेचा LIVE VIDEO

ठाणे
Updated Aug 17, 2022 | 15:40 IST

BJP and NCP Karyakarta fight in gym: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे. त्यातच आता डोंबिवलीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्याचं समोर आलं आहे. 

Dombivli BJP and NCP Activist fight CCTV: राज्यात सत्तांतर झाल्यावर ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरू झाला. याच संघर्षातून काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत शिंदे गट आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्याच दरम्यान आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असाही वाद झाल्याचं पहायला मिळत आहे. डोंबिवलीतील एका जिममध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भिडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (BJP and NCP activist clash in Dombivli gym caught in cctv watch video)

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसोबत नेमके कोणत्या कारणावरुन भिडले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. या प्रकरणाची माहिती मिळाताच पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी