Thane:ठाणेः डोंबिवतल्या कटाई नाका परिसरात अर्जुन हाईट्स नावाची एक इमारत आहे. सध्या राहाणाऱ्या रहिवाशांनी जेव्हा मालकाडून खोल्या विकत घेतल्या होत्या, तेव्हा मालकाने इमारतीमधील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं. मात्र रहिवाशांनी मालकाला वारंवार कामं पूर्ण करण्याची विनंती केल्यानंतरही मालकाने कामे पूर्ण केली नाहीत. शेवटी वैतागलेल्या रहिवाशांनी स्व :खर्चाने कामं पूर्ण करण्याचं ठरवलं. परंतु ते कामे करू देण्यासह त्याचा विरोध होता आणि त्याने तेथील एका रहिवाशाला मारहाण केली.
अधिक वाचाः Shivsena Symbol Case: धनुष्यबाण कुणाचा ?, दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर काय केला युक्तिवाद
फ्लोअरिंग सहित अनेक छोटी - मोठी प्रलंबित कामे करण्यासाठी जेव्हा बाहेरून कामगारांना बोलवण्यात आले, तेव्हा याचा राग धरून इमारत मालक सुजित, उमेश, प्रमोद, इंदिरा अर्जुन पाटील या चौघांनी मिळून कामगारांवर शिवीगाळ केली. त्यांनी कामगारांना हाकलण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारण्यासाठी सोसायटी सदस्य संदीप अशोक पाटील गेले असता, त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संदीप यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या संदर्भात तपास सुरू आहे.
अधिक वाचाः Nashik Bus Accident | भरधाव वेगात आली बस, अन् होत्याचे नव्हते झाले..., 14 जखमी, 6 गंभीर