VIDEO: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू 

ठाणे
Updated Dec 17, 2019 | 16:13 IST

Girl fall from local train: मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून पडून एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. गर्दीने भरलेली ट्रेन पकडणं तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. 

dombivli fast local train mumbai 22 year old girl fall dies maharashtra news marathi
VIDEO: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू  

थोडं पण कामाचं

  • मुंबई लोकलने घेतला आणखी एक बळी 
  • २२ वर्षीय चार्मी पासडचा लोकलमधून पडून मृत्यू 
  • डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान चार्मी लोकलमधून पडली 

ठाणे: मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. आपलं कार्यालय, कॉलेज वेळेवर गाठण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. अशाच प्रकारे डोंबिवलीतील चार्मी पासडने सोमवारी सकाळी डोंबिवलीहून सुटणारी लोकल पकडली. मात्र, लोकल ट्रेनला गर्दी अधिक असल्याने तिला आतमध्ये प्रवेश मिळालाच नाही आणि कोपर रेल्वे स्थानकापूर्वी ती लोकलमधून खाली पडली.

डोंबिवलीतील देसले पाडा परिसरात राहणारी २२ वर्षीय चार्मी पाचड हिने सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुंबईकडे जाणारी फास्ट ट्रेन पकडली. लोकल ट्रेनला गर्दी प्रचंड होती. यामुळे चार्मी ट्रेनच्या दरवाजातच उभी होती. मात्र, काही अंतरावर ट्रेन पोहोचताच तिचा हात सुटला आणि लोकलमधून खाली कोसळली. लोकमधून खाली पडल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र, दुर्दैवाने चार्मीचा मृत्यू झाला.

चार्मीच्या मृत्युने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मध्य रेल्वेवरील डोंबिवली रेल्वे स्थानक हे गर्दी्या स्थानकांपैकी एक आहे. डोंबिवलीहून जवळपास ३.५ लाख प्रवासी दररोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. या दुर्घटनेनंतर चार्मीच्या कुटुंबीयांनी मध्य रेल्वेला जबाबदार धरलं आहे. 

मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार यांनी सांगितले की, "ही घटना खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. पीडित कुटुंबाने रेल्वे क्लेम्स ट्रिब्यूनल (आरसीटी) अंतर्गत जर नुकसान भरपाईचा दावा केला तर त्यांना आर्थिक सहाय्य केलं जाईल. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत".

गेल्यावर्षीच्या तुलनेत अशा प्रकारच्या घटनांमध्ये १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. इतकच नाही तर दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या ४२० प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रवाशांकडून १,५५,००० रुपयांचा दंडही वसूल केला आहे असंही शिवाजी सुतार यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...