Dombivli Crime: वाहतूक पोलिसाला कार चालकाने फरफटत नेलं, डोंबिवलीतील घटनेचा LIVE VIDEO

ठाणे
Updated Jul 14, 2022 | 13:09 IST

Shocking CCTV, traffic cop dragged on car bonnet : डोंबिवलीत एका वाहतूक पोलिसाला वाहन चालकाने गाडीच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

डोंबिवली : नवी मुंबईत वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेल्याची घटना ताजी असताना आता असाच प्रकार डोंबिवलीत घडला आहे. डोंबिवली स्टेशन जवळील एस. के. पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे (वय 44) हे आपले कर्तव्य बजावत असतानाच एका गाडीचालकाने त्यांना फरफटत नेले. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Traffic cop dragged on car bonnet in Dombivli)

ही घटना बुधवारी संध्याकाळी 6.30च्या सुमारास घडली आहे. गाडीला काळ्या काचा आणि मोठ्याने डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा दिला. त्यानंतर गाडी चालकाने गाडी न थांबवता होरे यांच्या अंगावर घातली. होरे यांनी गाडीचे बोनेट पकडले असता चालकाने त्यांना फरफटवत गाडी चिपळूणकर रोड मार्गे बालभवनपर्यंत नेली. तेथे होरे यांना गाडीवरून खाली पाडत चालकाने पुन्हा मागे गाडी वळवून तेथून पळ काढला.

हे पण वाचा : पूर आलेली नदी ओलांडताना प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, धक्कादायक VIDEO आला समोर

दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या दरम्यान कारचालकाने एका रिक्षाचालकास देखील धडक दिली असून रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे. या घटनेत होरे यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी