मुंबई पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील १ ली ते ११ वी ऑफलाइन शाळा बंद 

ठाणे
Updated Jan 03, 2022 | 20:29 IST

Thane Offline school close from 4 jan 2022 । मुंबई :  मुंबई आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईपाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील  इ. १० आणि १२ वी चे वर्ग वगळता सर्व वर्गांच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा ऑफलाइन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

थोडं पण कामाचं
  • मुंबईपाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील  इ. १० आणि १२ वी चे वर्ग वगळता सर्व वर्गांच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा ऑफलाइन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
  • सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये आणि मुंबई आणि परिसरात ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढत
  • या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ते दि. 31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येणार

Thane Offline school close ।  ठाणे :  मुंबई आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईपाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील  इ. १० आणि १२ वी चे वर्ग वगळता सर्व वर्गांच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा ऑफलाइन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.  शाळा ऑनलाइन सुरू राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली आहे. 

सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये आणि मुंबई आणि परिसरात ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढत असल्याने मुंबई आणि परिसरातील एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमायक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महानगरपालिकासह ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ.9 वी व 11 वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ते दि. 31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली आहे. 


 
 प्रत्यक्ष उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरु राहणार आहे

विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार याकरीता महापालिका शाळांसह खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणा-या 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी