Eknath Shinde in Thane , ठाणे : हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. प्रत्येकाला वाटतं की हे आलं सरकार आहे. तुम्हांला वाटतं की नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात. मला तर अजून वाटत नाही की मी मुख्यमंत्री झालो आहे. मी तुमच्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता असल्यासारखं वाटतं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपलं होम पीच असलेल्या ठाण्याच्या टेंभी नाका येथील दहीहंडीत जोरादार फटकेबाजी केली.
अधिक वाचा : या गोष्टी पोखरताहेत तुमची किडनी
स्वर्गिय आनंद दिघे यांनी ठाण्याच्या टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सव सुरू केला होता. त्याच टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थित गोविंदांशी संवाद साधला. दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. गोविंदा उत्सवाला प्रो गोविंदा म्हणून खेळाचा दर्जा दिला आहे. तसेच गोविंदांना 5 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ही दहीहंडी आनंद दिघे यांनी सुरू केली होती. टेंभी नाका हे दहीहंडीची पंढरी असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनी हे सरकार स्थापन केले आहे. ते सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.
अधिक वाचा : पायांची जळजळ होणे म्हणजे असू शकतात हे आजार
गोविंदांनी सुरक्षितपणे थर लावावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आम्ही पण गेल्या दीड महिन्यांमध्ये वेगळीच दहीहंडी फोडली आहे. तब्बल 50 थरांची हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणे कठीण होतं पण करून दाखवलं की नाही, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
मी सुरूवातीला एक बैठक घेतली की गणपती उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे. मर्यादा निर्बंध आता बस झालेत. दोन अडीच वर्ष आपण मर्यादा निर्बंध पाळलेत, असे म्हणून मुख्यमंत्री हसले आणि म्हणाले, नियम तर पाळलेच पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव आणि त्यातील नियम अटी बाजूला केल्या. निर्बंध शिथील केलेत. मंडपांच्या परवानगीसाठी जे पैसे घेते होते ते देखील माफ करून टाकले. किती पैसे मिळणार आहेत सरकारला पैसे. दोन अडीच वर्ष आपण कोविडच्या सावटाखाली होतो. यावर्षी विघ्न हर्त्याने विघ्न दूर केले. हे करत असताना फक्त काळजी घेऊ या असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.