Amol Yadav First aircraft Issue , पालघर : भारताचा पहिला विमानाचा निर्माण कप्तान अमोल यादव यांनी केला. पालघर तालुक्यातील केळवे येथील प्रकल्पासाठी सरकारने त्याच्यासोबत मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात सामंजस्य करार केला होता.
अमोलने पहिले विमान बनवण्यासाठी आपली नोकरी सांभाळून मेहनतीने आपलं स्वप्न पूर्ण केले. स्वप्न पूर्ण करत असताना त्याला बऱ्याच अडचणींना सामोरी जावे लागले. महाराष्ट्राच्या मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमामुळे त्याला त्याच्या विमानासाठी जगभरातून प्रशंसा मिळाली. त्याचे कष्ट पाहून तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली सरकारकडून पालघर तालुक्यातील केळवे येथील साधारण 157 एकर जमीन वैमानिक शास्त्रज्ञ अमोल यादव यांना देण्याचे नियोजन करण्यात आले होते.
अधिक वाचा : RRR: 'नाटू नाटू' गाण्याला मिळाला बेस्ट ऑरिजनल सॉन्ग अवॉर्ड
आज ७ वर्षे उलटून गेलीत, पण विमान निर्मिती करिता देण्यात आलेल्या जमिनीचा अजूनही कुठलाही निर्णय करण्यात आलेला नाही. त्यामुळे अमोल यादव यांनी विमान निर्मितीचा प्रकल्प दहा हजार स्केयर फुटावर सुरू केला होता. परदेशात जो विमान निर्मितीचा खर्च हा मोठा असतो आणि जर हाच प्रकल्प भारताने केला तर २५ ते ४० टक्के खर्च भारताला होईल, जेणे करून खर्च वाचेल आणि भारताला त्याचा फायदा होईल.
अमोल यादव म्हणाले की, पालघर तालुक्यातील केळवे येथील जमीनीची माहिती त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी धुळे येथे प्रकल्प सुरू केला होता, त्याचा सगळा खर्च ते स्वतः करत होते.