आईच्या मित्राने केली 7 वर्षांच्या चिमुरड्याची गळा दाबून हत्या

ठाणे
Updated Jan 11, 2023 | 12:44 IST

शाळेतून सुटलेल्या 7 वर्षांच्या चिमुरड्याला परस्पर ताब्यात घेऊन आईच्या मित्राने त्याची हत्या केली आहे. त्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून स्वतःच पोलीसांकडे धाव घेतली.

थोडं पण कामाचं
  • आईच्या मित्राने गळा दाबून केली हत्या
  • आधी अपहर, मग खून
  • आरोपी स्वतःच गेला पोलिस ठाण्यात

Kalyan: कल्याण : कल्याणमध्ये एक धक्कादाय घटना घडली आहे. शाळेत जाणाऱ्या एका चिमुरड्याची त्याच्या आईच्या मित्राने हत्या केल्याची घटना घडली आगे. मुलाच्या आईशी भांडण झाल्याने आरोपीने रागाच्या भरात  चिमुरड्याचा गळा दाबून खून केला. चिमुरड्याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह आरोपीने इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत टाकला. कल्याण पश्चिमेच्या सुंदर रेसिडन्सीत हा संतापजनक प्रकार घडला असून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (kalyan 7 year old killed by mothers friend, murder dumped his body in water tank)

प्रणव भोसले असे या मृत चिमुरड्याचे नाव आहे. तर मुलाच्या आईचे नाव कविता आहे. सुंदर रेसिडन्सीमध्ये बी विंगमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या नितीन कांबळेने प्रणवचा खून केला. मुलाच्या आईशी म्हणजेच कविताशी आरोपीची मैत्री होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाले होते. याचा सूड घेण्यासाठी नितीन कांबळेने प्रणवची हत्या केली असल्याचा संशय आहे. 

अधिक वाचाः Mumbai Local Train: धावत्या ट्रेनमधून तो कोसळला अन् मदतीसाठी पोलीस कर्मचारी देवदूतासारखा धावला

प्रणव शाळेतून निघाल्यानंतर नितीनने त्याला शाळेच्या गेटवरून ताब्यात घेतले. यांनतर त्याने दुपारी 1 वाजताच्या सुमारास प्रणवची गळा दाबून हत्या केली. हे दुष्कृत्य लपवण्यासाठी त्याने फेसबुकवर आत्महत्या करत असल्याची घोषणा केली. मुलाच्या आईने आपल्याकडून 50 हजार घेतले होते आणि वारंवार मागणी करूनही पैसे देत नसल्यामुळे आत्महत्या करतो आहे, असं सांगितलं. यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि आपण एका महिलेच्या त्रासाला कंटाळून विषारी गोळ्या खाल्याचे सांगितले.

अधिक वाचाः Nashik Bus Accident | भरधाव वेगात आली बस, अन् होत्याचे नव्हते झाले..., 14 जखमी, 6 गंभीर

मुलगा घरी न परतल्याने चिंतित झालेल्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलाच्या बेपत्ता होण्याबद्दल विचारलं असता आईने सांगितले की, मुलाचे नितीन कांबळे याने अपहरण केले आहे. पोलीस ठाण्यात स्वतःहून दाखल झालेल्या नितीनची पोलिसांनी त्वरीत चौकशी केली. तेव्हा त्याने कबूल केले की, त्यानेच कवितांच्या लहान मुलाची हत्या केली आहे. आरोपीने पैशाच्या वादातून मुलाची हत्या केली की, त्यामागे आणखी कोणते कारण होतं याचा पोलीस अजूनही तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी