ऐटीत रेल्वे प्रवाशांच्या तिकिटांची करत होते तपासणी, पण एका झटक्यात अडकले पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे
Updated Sep 25, 2022 | 20:31 IST

Bogus tc arrested: दोन बनावट टीसींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींकडून दोन माबाइल फोन, बनावट आयकार्ड आणि इतर साहीत्य जप्त करण्यात आले आहे. 

Bogus Ticket Collector arrest in Kalyan: काळा कोट आणि पांढरा शर्ट, हातात टीसी असल्याचे पावती बूक घेऊन दोन टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करत होते. त्याचे हावभाव पाहून रेल्वेतील अधिकृत टीसी आणि त्यांच्या सहकऱ्याला स्टेशनवरुन वावरत असताना त्या दोन टीसींचा संशय आल्याने दोन्ही बोगस टीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. (Kalyan bogus ticket collector tc arrest by police watch video indian railway irctc)

रोहिदास गायकवाड आणि संदीप पवार अशी अटक आरोपींची नाव असून कसारा रेल्वे स्थानकात हे दोघे शनिवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सूमारास  फलाट क्रमांक 4 वरील रेल्वे कॅन्टीन समोर प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळेला आलेल्या गाडीमध्ये रेल्वे कर्मचारी आणि टीसी संतोष त्रिपाठी आणि विष्णू सांबरे यांनी या दोघांना हटकले. यावेळी त्या दोघांनी बनावट ओळखपत्र दाखवून ते रेल्वेमध्ये टीसी असल्याची बतावणी करू लागले. मात्र त्यांच्या बोलण्यावरून तिवारी यांना संशय आला म्हणून ही बाब त्यांनी रेल्वे प्रशासनाला कळवली. 

तात्काळ तेथे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पोहोचून रेल्वे विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती  घेतली. त्यांच्याकडे रेल्वेचे दोन बनावट ओळखपत्र आणि दोन मोबाईल फोन मिळून आले. त्यानंतर ही पोलिसांनी त्याला विचारणा केली असता ते दोघे पोलिसांना अजून आपन खरे टीसी असल्याचं पोलिसांना सांगत असल्याने पोलीस  चक्रावले आहेत. त्यांना टीसीचे आयकार्ड  कोणी दिले याचा शोध पोलीस घेत आहेत. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी