Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापालिका आयुक्तांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयी सुविधांशी निगडित असलेल्या या विषयात महापालिका अधिकारी मात्र उदासीन असल्याचे दिसून आले. महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे एकीकडे अर्थसंकल्प सादर करत त्यातील तरतुदी सांगत असताना निम्म्याहून अधिक महापालिकेचे अधिकारी मात्र मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचा पाहायला मिळालं.
याबाबत पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी संबधित अधिकारी सोशल मीडियावर होते की मोबाइलवर ऑफिसचं काम करत होते हा तपासण्यात येईल असे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
कल्याण डोंबिवली मनपाच्या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानात आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड रिकामे करणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कार्यान्वित करणे, कचरा प्रकल्प वाढवणे, मोबाइल टॉयलेट सुविधाचा समावेश करण्यात आला आहे.
शहरात नवीन प्रसुतीगृह, 68 हेल्थ सेंटर, केमोथेरपी सेंटर, रेडिओथेरपी सेंटर, पाळीव प्राण्यांचा दवाखाना या सुविधांचाही अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.