leopard । कल्याणमध्ये इमारतीत घुसला बिबट्या, तब्बल आठ तास ठोकला मुक्काम, पाहा Video

leopardattack : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका इमारतीत बिबट्या शिरल्याची घटना घडली. पण त्याला बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने त्याने तब्बल ८ तास मुक्काम ठोकला. दरम्यान, त्याने दोघांवर हल्ला केला.

leopard entered the building in Kalyan, took eight hours to reach the destination, watch Video
leopard । कल्याणमध्ये इमारतीत घुसला बिबट्या, तब्बल आठ तास ठोकला मुक्काम, पाहा Video  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोड श्रीराम अनुग्रह टॉवर येथे शिरला बिबट्या...
  • चिंचपाडा रोडवर बिबट्याचा धुमाकूळ तीन जण जखमी
  • वन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

कल्याण : कल्याण शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरल्याची खळबळ घटना समोर आली आहे. मात्र, बिबट्याने इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने त्या धुमाकूळ घालत तिघांवर हल्ला केला. आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. (leopard entered the building in Kalyan, took eight hours to reach the destination, watch Video)

अधिक वाचा : 'everything will be ok' असं स्टेटस ठेवत तरुणाने केली आत्महत्या

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हा परिसर तसा दाट लोकवस्तीचा आहे. येथील श्रीराम अनुग्रह टॉवर या इमारतीत पहाटेच्या सुमारास बिबट्या शिरला. सुरुवातीला तो इमारतीच्या पार्किंगमध्ये होता. त्यानंतर तो थेट इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर पोहोचला. मात्र, त्याला बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने त्याने बिबट्यात मुक्काम ठोकला. दरम्यान, इमारतीमधील दोघांवर बिबट्याने हल्ला चढवला.

अधिक वाचा : कोण पण समोर येऊ दे, मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही असं स्टेटस ठेवला आणि सकाळी झाला मृत्यू

त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती पोलिसांना देताच त्यांनी इमारतीतील सर्व रहिवाशांना दारे खिडक्या बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही वेळाच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्तीचे प्रयत्न करुन बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी