Maharashtra: पालघरमध्ये स्टीलच्या कारखान्यात हिंसा, १९ पोलीस जखमी, अनेक वाहने लक्ष्य

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated May 08, 2022 | 19:10 IST

पालघरच्या एका स्टीलच्या कारखान्यात कामगारांमध्ये मारहाण झाली आहे. कारखान्यातील हिंसा रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही कामगारांनी हात उचलला असून त्यांना मारहाण केली आहे. यातील बहुतांश लोक हे कामगार आणि मजूर आहेत.

palghar violence
पालघर हिंसाचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पालघरच्या एका स्टीलच्या कारखान्यात कामगारांमध्ये मारहाण झाली आहे.
  • कारखान्यातील हिंसा रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही कामगारांनी हात उचलला असून त्यांना मारहाण केली आहे.
  • यातील बहुतांश लोक हे कामगार आणि मजूर आहेत.

Palghar Violence  : पालघर:  पालघरच्या एका स्टीलच्या कारखान्यात कामगारांमध्ये हिंसाचार झाला आहे. हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही कामगारांनी हल्ला केला असून यात्ग १९ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 
 

मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीत विराज प्रोफाइल नावाची स्टील कंपनी आहे. या कंपनीच्या प्रशासनाशी आणि कामगार संघटनेचे मतभेद झाले. त्यानंतर कामगारवर्ग हिंसक झाला आणि त्यांनी हिंसाचार सुरू केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा प्रक्षुब्ध कामगारांनी पोलिसांनाही मारहाण केली आणि पोलिसांच्या गाड्यांही फोडल्या. या हल्ल्यात १९ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी आणखी कुमक मागवली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी २७ जणांना ताब्यातही घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  या हिंसाचारात १२ वाहनांचे नुकसान झाले आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी