EXCLUSIVE: मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

Exclusive on Hansukh Hiren death case: मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात टाइम्स नाऊ (TIMES NOW)कडे एक धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. 

Mansukh hiren death case autopsy attendant said postmortem not taped exclusive report
EXCLUSIVE: मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती उघड  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू 
  • मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात कुटुंबीयांचे सचिन वाझेंवर गंभीर आरोप
  • अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात सचिन वाझेंना एनआयएकडन अटक

ठाणे : ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी आणि विरोधी पक्षाने सचिन वाजेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती टाइम्स नाऊच्या हाती आली आहे. मनसुख हिरन यांच्या पोस्टमार्टमचं व्हिडिओ शूट करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती. मात्र, आता अशी माहिती उघड झाली आहे की, पोस्टमार्टम करताना घटनास्थळी व्हिडिओ कॅमेराच उपलब्ध नव्हता आणि व्हिडिओ शूट करण्यात आलेलेच नाहीये. (Mansukh hiren death case autopsy attendant said postmortem not taped exclusive report)

मनसुख हिरन यांच्या मृतदेहाचे ज्यावेळी पोस्टमार्टम होत होते त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अटेंडंटने सांगितलं की, पोस्टमार्टम रूममध्ये एकही कॅमेरा नव्हता. ज्यावेळी रिपोर्टरने अटेंडंटला प्रश्न विचारला की, पोस्टमार्टम रूममध्ये एक कॅमेरा होता की दोन होते. त्यावर अटेंडंटने म्हटलं, एकही कॅमेरा नव्हता. कॅमेरा जेजे रुग्णालयात असतात इथे नाही. तिथे परवानगी असते इथे परवानगी नाहीये. 

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या गाडीची तपासणी केली असता त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे करत होते. त्याच दरम्यान या गाडीचे मालक असलेले मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

मनसुख हिरन यांचा मृत्यू आणि स्फोटकांनी भरलेली गाडी या प्रकरणांवरुन विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ घातला. तसेच या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी केली. यानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांची बदली केली. तर तिकडे मनसुख हिरन यांच्या कुटुंबीयांनीही सचिन वाझे यांना जबाबदार धरलं. नंतर स्फोटक सापडल्याच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला. एनआयएने सचिन वाझे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि १२ तास चौकशी केल्यावर सचिन वाझे यांना अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी