[VIDEO]: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मुलीचं अपरहरण करुन १२ तास सामूहिक बलात्कार

ठाणे
Updated Nov 20, 2019 | 19:19 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Minor girl gang-raped: महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. मुंबईजवळ असलेल्या नालासोपारा येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

minor girl abducted gang raped 12 hours nalasopara mumbai crime news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • पीडित मुलगी मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती घराबाहेर
  • मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मुलीचं अपहरण
  • अपहरण करुन आरोपींनी निर्माणाधीन इमारतीत नेलं
  • चार आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी केली अटक

नालासोपारा: मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या नालासोपारात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी या मुलीवर सलग १२ तास बलात्कार केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेतील चार आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तर अद्याप चौथा आरोपी हा फरार आहे. सर्व आरोपींवर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित मुलगी शुक्रवारी मॉर्निंग वॉकसाठी आपल्या घरातून बाहेर पडली होती. यावेळी रिक्षातून आलेल्या आरोपींनी तिचा मार्ग रोखला आणि त्यानंतर तिचं अपहरण केलं. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तिचं अपहरण केलं. यावेळी पीडित मुलीच्या मैत्रिणींनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिच्या मैत्रिणींनाही धमकावले. यानंतर आरोपींने तरुणीला रिक्षात बसवून एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत नेलं.

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत आरोपींनी पीडित तरुणीला नेलं आणि त्यांतर तिच्यावर १२ तास आळी-पाळीने बलात्कार केला. संध्याकाळच्या सुमारास पीडित तरुणीने या आरोपींच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि तेथून पळ काढला.

शनिवारी सकाळी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींपैकी एका आरोपीला पीडित तरुणी ओळखते. तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटवली आणि त्यानंतर विविध ठिकाणी धाड टाकत तिघांना अटक केली.  तर एक आरोपीचा शोध अद्याप सुरु आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी