Raigad accident: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर पलटी, अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम, VIDEO

ठाणे
Updated Nov 07, 2022 | 15:48 IST

Accident on Mumbai - Goa highway: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर पलटी झाला आहे. या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

Raigad Accident: मुंबई - गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालीय. महामार्गावरील मोठमोठे जीवघेणे खड्डे अपघातास कारणीभूत ठरतायेत. या मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. कोलाड नजीकच्या सुकेळी खिंडीत अवजड कॉईल वाहून नेणारा ट्रेलर रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन अपघात झाला. 

अवजड कॉईल कोसळल्याने रस्त्यात भला मोठा खड्डा पडला असून अद्याप अपघाती अवस्थेत हे वाहन असल्याने वाहतुकीस अडथळा होतोय. या अपघातात ट्रेलर चे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळलीय. मात्र महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी