VIDEO: अंबरनाथमध्ये महिला टीसीला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद 

ठाणे
Updated Dec 26, 2019 | 18:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Woman tc beaten by passenger: मध्य रेल्वेच्या अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका महिला टीसीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

mumbai local train central railway woman ticket checker tc beaten ticketless passenger cctv ambernath station marathi news
VIDEO: अंबरनाथमध्ये महिला टीसीला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद   |  फोटो सौजन्य: Times Now

ठाणे: मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या लोकल ट्रेनच्या मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडे टीसीने तिकीटाची मागणी केली. यावेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलेने चक्क टीसीलाच मारहाण केली. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. तसेच हा प्रकार रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेप्रकरणी आरोपी महिला प्रवाशाला अटक करण्यात आलं आहे अशी माहिती जीआरपीने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ रेल्वे स्थानकात महिला टीसी नम्रता शेडगे या नेहमी प्रमाणे आपलं तिकीट तपासण्याचं काम करत होत्या. त्याच दरम्यान नम्रता शेडगे यांनी रेल्वे प्रवासी मिनल यांच्याकडे तिकीटाची मागणी केली. आपल्याकडे तिकीटाची मागणी केल्याने मिनल चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी टीसी नम्रता शेडगे यांना मारहणा केली.

ही घटना घडत असताना जीआरपीच्या हेड कॉन्स्टेबल अनिता कांबळे यांनी आरोपी महिला प्रवाशाला रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर मिनल यांनी अनिता कांबळे यांनाही धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी जीआरपीने तक्रार दाखल केली असून आरोपी मीनल यांना अटक केली आहे.

तिकीट तपासणीस असलेल्यांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्याचं दिसत आहे. मंगळवारी सुद्धा असाच एक प्रकार समोर आला होता. वांद्रे रेल्वे स्थानकात टीसी विवेक कुमार यांच्यावर एका प्रवाशाने हल्ला केला होता. तर त्याच दिवशी किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकातही एका प्रवाशाने टीसी हरेराम शर्मा यांना मारहाण केली होती.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...