[VIDEO]: नवी मुंबईत तरुणाचा वायरवर पाय पडल्याने स्फोट, आगीमध्ये तरुण होरपळला

ठाणे
Updated Sep 23, 2019 | 17:16 IST | टाइम्स नाउ डिजिटल

Navi Mumbai schocking video: उघड्या वायरवर पाय पडल्याने अचानक स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

navi mumbai boy step on live wire catch fire cctv camera shocking video maharashtra news
[VIDEO]: नवी मुंबईत तरुणाचा वायरवर पाय पडल्याने स्फोट, आगीमध्ये तरुण होरपळला 

थोडं पण कामाचं

  • नवी मुंबईतील धक्कादायक घटना
  • उघड्या वायरवर पाय पडल्याने स्फोट
  • स्फोट झाल्याने आग लागल्याने तरुण होरपळला
  • घटनेत तरुण गंभीर जखमी
  • नवी मुंबईतील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नवी मुंबई: रस्त्यावर उघड्या पडलेल्या वायरवर पाय पडल्याने अचानक स्फोट झाल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात हा प्रकार घडला असून या घटनेत तरुण होरपळला आहे. एका वायरवर तरुणाचा पाय पडला आणि त्यानंतर स्फोट होऊन आग लागली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात असलेल्या सेक्टर पाच येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणाहून २० वर्षांचा शुभम हा चालत जात होता. त्याचवेळी त्याचा पाय एका उघड्या वायरवर पडला आणि त्यानंतर अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली आणि या आगीत शुभम होरपळला. ही संपूर्ण घटना त्याच परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

स्फोट होऊन लागलेल्या आघीने शुभमच्या कपड्यांना आग लागली. आग लागताच शुभम मागे धावत येत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी शुभमच्या कपड्यांना लागलेली आग विझवली. मात्र, या अपघातात शुभम होरपळला गेला. शुभमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेमुळे उघड्या असलेल्या वीज वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. वीज कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्यानंतरच प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

गणपती विसर्जनाच्या दरम्यान चौघे होरपळले

काही दिवसांपूर्वी गणपती विसर्जनासाठी गणपती बाप्पा घेऊन जात असताना गणरायाची मूर्ती हाय व्होल्टेज वायरला स्पर्श झाली. यावेळी चार तरुण होरपळले होते. नवी मुंबईतील सीवूड परिसरात असलेल्या शिवछत्रपती गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत हा प्रकार घडला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी