राज ठाकरेंना धमकी देणारा फरार

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Apr 17, 2022 | 14:10 IST

PFI leader Matin Shekhani who threatened Raj Thackeray absconded : 'छेड़ोगे, तो छोड़ेंगे नहीं' अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना धमकी देणारा पीएफआयचा (Popular Front of India - PFI) मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी (Mateen Shekhani) फरार झाला आहे.

PFI leader Matin Shekhani who threatened Raj Thackeray absconded
राज ठाकरेंना धमकी देणारा फरार 
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंना धमकी देणारा फरार
  • मुंब्रा पोलीस धमकी देणाऱ्या मतीन शेखानीला शोधत आहेत
  • PFI च्या धमकीला राज ठाकरेंचं उत्तर

PFI leader Matin Shekhani who threatened Raj Thackeray absconded : ठाणे : 'छेड़ोगे, तो छोड़ेंगे नहीं' अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना धमकी देणारा पीएफआयचा (Popular Front of India - PFI) मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी (Mateen Shekhani) फरार झाला आहे. मशिदींवर भोंगे राहणार असतील तर आम्ही लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू. मशिदींवरचे भोंगे काढा; अशा स्वरुपाची वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. यानंतर मतीन शेखानीने राज ठाकरेंना धमकी दिली होती. मुंब्रा पोलीस मतीन शेखानीला शोधत आहेत. 

'टाइम्स नाउ नवभारत'चे कंसल्टिंग एडिटर सुशांत सिन्हा यांनी शनिवार १६ एप्रिल २०२२ रोजी मतीन शेखानीला काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना उत्तर देताना राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या मतीन शेखानीला बरीच सारवासारव करावी लागली होती. स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आता मतीन शेखानी फरार झाला आहे. याउलट धमकी मिळाल्यानंतर राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत. 

राज यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी मनसे प्रमुखांची तुलना थेट एमआयएमच्या ओवैसींशी केली होती. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट सामना कार्यालयाबाहेर एक पोस्टर लावले. यात राज ठाकरे यांचा फोटो पोस्टरच्या वरच्या भागात आहे. पोस्टरवरील वाक्यांतून संजय राऊतांना मनसे स्टाईलने इशारा देण्यात आला आहे. 

'काही वर्षांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची कार उलटविली होती. संजय राऊत यांनी त्यांचा 'लाउडस्पीकर' बंद केला नाही तर मनसे त्यांच्या स्टाईलने बंद करेल' अशा शब्दांत मनसेने इशारा दिला आहे. 

PFI च्या धमकीला राज ठाकरेंचं उत्तर

पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी  पीएफआयचा मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी याच्या धमकी उत्तर दिले. आम्ही आमचे हात बांधलेले नाहीत असे राज ठाकरे म्हणाले. मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी मुदत दिली आहे. ही मुदत संपेपर्यंत भोंगे काढले नसतील तर ३ मे २०२२ रोजी तयार राहा असे राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी