Thief Caught : चोरी करणार्‍या सासू सुनेचा गेम फसला! कल्याण रेल्वे स्थानकातून सासू-सुनेला अटक

ठाणे
Updated Dec 22, 2021 | 18:01 IST

crime branch arrested two women स्थानकात  किंवा धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना कल्याणमध्ये नेहमीच्याच झाल्या होत्या. मात्र चोऱ्या  करणाऱ्या एका जोडीचा भांडाफोड पोलिसांनी केलाय. रेल्वे स्थानकात मोबाईलवर  डोळा ठेवून चोऱ्या करणारी ही जोडी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही, तर चक्क सासूसुनेचीच असल्याचं उघड झालंय.

थोडं पण कामाचं
  • धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना कल्याणमध्ये नेहमीच्याच झाल्या होत्या.
  • चोऱ्या  करणाऱ्या एका जोडीचा भांडाफोड पोलिसांनी केला.
  • महिलांना सापळा रचून ताब्यात घेतले

Thief Caught : कल्याण : रेल्वे स्थानकात  किंवा धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना कल्याणमध्ये नेहमीच्याच झाल्या होत्या. मात्र चोऱ्या  करणाऱ्या एका जोडीचा भांडाफोड पोलिसांनी केलाय. रेल्वे स्थानकात मोबाईलवर  डोळा ठेवून चोऱ्या करणारी ही जोडी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही, तर चक्क सासूसुनेचीच असल्याचं उघड झालंय. या दोघींनीही कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. रेल्वे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. (police arrested mother in law and daughter in law from kalyan station theft case)

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एक महिलेनं आपली पर्स चोरी झाल्याची तक्रार दिली होती. या पर्समध्ये ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. तपोवन एक्स्प्रेसच्या गाडी पकडत असताना ही चोरी झाली होती. ११ डिसेंबरला चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी  बारीक नजर ठेवून सीसीटीव्ही तपासले असता  एका व्हिडीओत दोन महिला  पळ काढताना आढळून आल्या.

या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांचे काम अधिकच सोपं झालं. पोलिसांनी या दोन्ही महिलांना सापळा रचून ताब्यात घेतले पोलिसांच्या माहितीनुसार अटक कऱण्यात आलेल्या सासूचं नाव रेखा कांबळे असं असून सुनेचं नाव रोझा कांबळे आहे.  या दोघींची  चौकशी केली असता त्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आतापर्यंत तीन गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली.  दोन्ही आरोपींकडून  ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच दोघींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी