[VIDEO]: PUBG गेम खेळणारा तरुण अचानक बेपत्ता, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

ठाणे
Updated Sep 21, 2019 | 20:03 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Navi Mumbai youth runs away over PUBG addiction: पबजी गेमने तरुणांना अक्षरश: वेड लावल्याचं पहायला मिळत आहे. या गेमच्या आहारी गेलेल्या मुलांच्या बाबत अनेक अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Aayush Ashok Chudaji pubg game addiction navi mumbai youth runs away home nerul maharashtra
[VIDEO]: PUBG गेम खेळणारा तरुण अचानक बेपत्ता, नवी मुंबईतील धक्कादायक घटना 
थोडं पण कामाचं
  • नवी मुंबईतील धक्कादायक घटना
  • १६ वर्षीय विद्यार्थ्याला पबजी गेमचं लागलं होतं वेड
  • पबजी गेम खेळतो म्हणून आई-वडिल ओरडल्याने तरुणाने सोडंल घर
  • बेपत्ता तरुणाच्या आई-वडिलांनी दाखल केली पोलिसांत तक्रार

नवी मुंबई: ऑनलाईन गेम असलेल्या पबजी गेम ने तरुणांना अक्षरश: वेड लावल्याचं पहायला मिळत आहे. या गेमच्या नादात आतापर्यंत अनेक तरुणांसोबत विविध अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार पबजी गेम खेळणाऱ्या नवी मुंबईतील १६ वर्षीय तरुण अचानक घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणारा १६ वर्षीय आयुष अशोक चुडाजी हा तरुण सोमवारपासून बेपत्ता झाला आहे. नेरुळमधील साई सावली सोसायटीत तो राहत होता. आयुष सोमवारी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला आणि परत घरी आलाच नाही. या प्रकरणी त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, १६ वर्षीय आयुषला पबजी गेमचं प्रचंड वेड होतं आणि तो या गेमच्या आहारी गेला होता. रात्री आई-वडील झोपल्यानंतर तो संपूर्ण रात्रभर गेम खेळत रहायचा. तर सकाळी उशीरा उठायचा आणि पुन्हा सायबर कॅफेमध्ये गेम खेळण्यासाठी जात असे. या विद्यार्थ्याने पबजी गेम खेळण्याच्या नादात कॉलेजमध्ये गेल्या १५ दिवसांपासून एकही लेक्चर अटेंड केलेलं नाहीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला सायबर कॅफे मालकाने नोकरी देण्याचं आश्वासन देत पुण्यात बोलावलं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे तो पुण्यात असण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट्सनुसार, या तरुणाच्या काकांनी सांगितले की, "आम्हाला कळलं आहे की, ज्याच्यासोबत तो गेम खेळत असे त्याने आयुषला सायबर कॅफेमध्ये नोकरीचं आश्वासन दिले होते, जेथे तो हवा तितका वेळ गेम खेळू शकत होता म्हणून तो पुण्यात गेला. आयुषच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक पुण्याला पाठवलं आहे. त्यासोबत आम्ही सुद्धा सायबर कॅफे, गेम पार्लरमध्ये त्याचा शोध घेत आहोत".

मुलाचे काका नंदु आगडे यांनी म्हटलं की, आयुषला पबजी गेमचं प्रचंड वेड होतं आणि तो नेहमीच गेम खेळत असे, त्याला आई-वडील ओरडत असतं. त्यामुळे कदाचित तो घरातून पळून गेला असावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी